राहुरी तालुका व ग्रामीण भागातील अनधिकृतपणे मस्जिदवरील लावण्यात आलेले भोंगे काढावेत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुका व ग्रामीण भागातील अनधिकृतपणे मस्जिदवरील लावण्यात आलेले भोंगे काढावेत

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील मस्जिदवरील भोंगे तातडीने न हटविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेण्यावतीने चौका चौकात व प्रत्येक मंदिरात भो...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील मस्जिदवरील भोंगे तातडीने न हटविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेण्यावतीने चौका चौकात व प्रत्येक मंदिरात भोंगे लावून हनुमान चालीसा पठन करेल असा इशारा राहुरी तालुका मनसेच्यावतीने आज सोमवारी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिलेल्या निवेदनात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटले की, अनेक वर्षापासून मस्जिदवरील मुस्लीम धर्मीय समाजाचे लोक विनापरवाना भोंगे लावून मोठ्या कर्कश आवाजाने अजाण करतात भोंगे यांचा आवाज मुद्रा यामध्ये कर्कश पद्धतीने येतो. शुक्रवारी आवाजाचे प्रमाण खूपच जास्त असते. यामुळे मस्जिदच्या आजूबाजूला व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भांगेचे डेसिबल शासनाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त प्रमाणात असते. यामुळे ध्वनिप्रदूषण नियमाचे उल्लंघन होत आहे. या आवाजाने अनेक वृद्ध व लहान मुले आणि रुग्णांना मानसिक त्रास होत आहे. महाराष्ट्र राज्यात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करताना पोलीस प्रशासन दिसत नाही.


देशामध्ये देशद्रोही आतंकवादी हे मदरसा व मस्जिदमध्ये आश्रय घेतात हे सिद्ध झालेले आहे. म्हणून मदरमा व मस्जिदमध्ये येणाऱ्याची पोलीस प्रशासनाने वेळोवेळी चौकशी करणे गरजेचे आहे. या संदर्भात आमच्या निवेदनाची दखल घेऊन मस्जिद वरील भोंगे न हटविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेण्यावतीने चौका चौकात व प्रत्येक मंदिरात भोंगे लावून  दिवसातून ५ वेळा हनुमान चालीसा पठन करण्यात येईल. प्रसंगी काही जातीय तेढ निर्माण झाल्यास सर्वस्वी पोलीस प्रशासनाची जबाबदारी राहील असा इशारा या निवेदनात दिला आहे.


यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, मनसे प्रदेश  उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण चव्हाण, राहुरी तालुकाध्यक्ष अनिल डोळस, राहुरी शहराध्यक्ष प्रतिक विधाते, राहुरी फॅक्टरी मनवीसे शहराध्यक्ष संदेश पोटोळे, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष शिवराज तारडे,सागर माने, प्रमोद विधाटे, मनोज जाधव, किरण वराळे आदिंसह मनसैनिक उपस्थित होते.


1 टिप्पणी

  1. Payout percentages can have a huge impact on how well you do at 토토사이트 on-line gambling. Our specialists check each on-line casino to see which of them provide one of the best payout percentages. From cash bonuses to free spins, you’re sure to find out|to search out} one thing that retains you coming again for extra enjoyable. Ruby Fortune is an entertaining on-line casino with tons of of slots.

    उत्तर द्याहटवा