कोपरगाव / प्रतिनिधी:- शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकमठाण येथील परमेश्वरी लॉन्सजवळ एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण धू...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकमठाण येथील परमेश्वरी लॉन्सजवळ एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण धूमस्टाईलने ओरबाडून नेले. सदर घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोकमठाण येथील परमेश्वरी लॉन्सकडे आशा उत्तम आव्हाड (वय ५४, रा.तीनचारी, कोकमठाण) ह्या जात होत्या. त्यावेळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे (अंदाजे किंमत ९० हजार रुपये) गंठन धूमस्टाईलने ओरबाडून नेले. यामुळे भेदरलेल्या आशा आव्हाड यांनी तत्काळ शहर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुरनं.९३/२०२२ नुसार गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, या घटनेने महिलांत भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी वेळीच कडक पावले उचलून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत