खाजगी सावकारकीच्या जाचास कंटाळून राहुरी फॅक्टरीतील तरुणाचे पलायन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खाजगी सावकारकीच्या जाचास कंटाळून राहुरी फॅक्टरीतील तरुणाचे पलायन

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड परिसरातील एका तरुणाने   खासगी सावकारीला कंटाळून पलायन केले असल्याची जोरदार चर्...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड परिसरातील एका तरुणाने   खासगी सावकारीला कंटाळून पलायन केले असल्याची जोरदार चर्चा आहे. या तरुणाचा फोनही बंद असून घरच्या सदस्यांनी  त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने भीती व्यक्त होत आहे.


राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील खासगी सावकारकी तेजीत सुरू असून अनेकांना तगादा, घरी येऊन दमबाजीच्या घटना दररोज घडत आहे.

दरम्यान गेल्या दोन  दिवसापूर्वी राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड परिसरातील २३ वर्षीय युवक खासगी सावकारकीच्या जाचास कंटाळून पलायन केले आहे. या चर्चेने पुन्हा एकदा खासगी सावकारीचा विषय ऐरणीवर आला आहे. सदर तरुणाच्या घरी काल खासगी सावकारकी करणाऱ्यांनी आमचे पैसे ठेवा अशी दमबाजी केल्याची माहिती समोर आली आहे.

देवळाली व फॅक्टरी परिसरातील खासगी सावकारकी रोखण्याचे मोठे आवाहन पोलीस प्रशासनापुढे असून त्याकडे कशा प्रकारे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे लक्ष घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत