कोपरगाव तालुका नागरी बँक कर्मचारी पतसंस्थेस रुपये आठ लाख अकरा हजाराचा नफा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव तालुका नागरी बँक कर्मचारी पतसंस्थेस रुपये आठ लाख अकरा हजाराचा नफा

कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव तालुक्यातील दि कोपरगाव पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड व गौतम सहकारी बँक लिमिटेड यांचे कर्मचारी वर्गाची सभासद असलेल...

कोपरगाव/वेबटीम:-


कोपरगाव तालुक्यातील दि कोपरगाव पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड व गौतम सहकारी बँक लिमिटेड यांचे कर्मचारी वर्गाची सभासद असलेल्या कोपरगाव तालुका नागरी सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेस नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात रुपये आठ लाख अकरा हजार मात्रचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री बाळासाहेब सर्जेराव जाधव यांनी दिली,  संस्थेचे भाग भांडवल रुपये 55.14 लाख,  निधी रुपये 31.56 लाख,  गुंतवणूक रुपये 26.51 लाख व सभासदांना कर्ज वाटप रुपये 84.43 लाख असून ग्रॉस एनपीए शून्य टक्के आहे हे अभिमानास्पद आहे, संस्थेच्या प्रगतीमध्ये सातत्याने वाढ होत असून सभासदांना आर्थिक गरजा भागविण्याकरिता कमीत कमी व्याजदरामध्ये तत्पर वित्तपुरवठा संस्थेमार्फत केला जातो, तसेच वाटप झालेल्या कर्जाची शंभर टक्के नियमित वसुली असून संस्थेचा ग्रॉस एनपीए व थकबाकी 0% राखण्यात यावर्षीही यश प्राप्त झाले आहे, अशी माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री राजेंद्र बाळासाहेब सुपेकर यांनी दिली, सभासदांना मागील वर्षांमध्ये बारा टक्के लाभांश देण्यात आला असून, सतत ऑडीट वर्ग "अ" प्राप्त आहे संस्थेचे यशामध्ये संस्थेचे संचालक सर्वश्री बबनराव भागवत, विरेश पैठणकर, गोकुळ गंगवाल, महेंद्र ऊगले, सुधाकर नरोडे, विश्वनाथ धुळे, सौ. शैला लावर, सौ सुचेता कदम व सचिव श्री जितेंद्र छाजेड, श्री प्रदीप मेढे यांचा मोठा वाटा आहे, संस्थेच्या यशस्वी वाटचालीस पिपल्स बँकेचे जनरल मॅनेजर श्री.दिपक एकबोटे साहेब व गौतम बँकेचे जनरल मॅनेजर श्री घेमुड साहेब यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत