राहुरी फॅक्टरी(वेबटीम) अल्पावधीत ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर बनलेल्या राहुरी फॅक्टरी येथील दि राहुरी अर्बन मल्टिपर्पज निधी संस्थेच्या अ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
अल्पावधीत ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर बनलेल्या राहुरी फॅक्टरी येथील दि राहुरी अर्बन मल्टिपर्पज निधी संस्थेच्या अहमदनगर शाखेचा शुभारंभ गुरुवार दि.२१ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४ वाजता माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
अहमदनगर येथील स्टेट बँकेजवळील श्री.छत्रपती शिवाजी व्यापारी संकुल येथे दि राहुरी अर्बन निधी संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्यात आली असून या शाखेचे उद्घाटन माजीमंत्री कर्डीले व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास आ.संग्राम जगताप, युवा नेते हर्ष तनपुरे, जिल्हा बँकेचे संचालक संपतराव म्हस्के, उद्योजक बलभीमराव काळे, सरपंच बाबासाहेब काळे, व्याख्याते तथा सरपंच गणेश शिंदे, महाराष्ट्र राज्य निधी फेडरेशन अध्यक्ष संदीप थोरात, हिवरे बाजार सोसायटी संचालक मारुती ठाणगे, सरपंच मच्छीन्द्र कराळे, नगर तालुका दूध संघाचे संचालक रामदास शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश पोटे, मोरया पेट्रोलियमचे बाबासाहेब गुंजाळ, कामक्षा अँटोचे पोपट ठोकळ, युवा उद्योजक भागचंद झांजे आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन रामचंद्र(रामभाऊ) विठ्ठल काळे, सर्व संचालक तसेच अधिकारी व कर्मचारी वृंद आदींनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत