सात्रळ-माळेवाडी डुक्रेवाडी रस्ता खड्डेमय, दुरुस्तीची मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ-माळेवाडी डुक्रेवाडी रस्ता खड्डेमय, दुरुस्तीची मागणी

सात्रळ/वेबटीम:- प्रधानमंत्री ग्रामसडक  योजनेत समाविष्ट  असलेला सात्रळ माळेवाडी डुक्रेवाडी  रस्ता सद्या  जागोजागी डांबरी करण उखडल्यामुळे  खड्...

सात्रळ/वेबटीम:-


प्रधानमंत्री ग्रामसडक  योजनेत समाविष्ट  असलेला सात्रळ माळेवाडी डुक्रेवाडी  रस्ता सद्या  जागोजागी डांबरी करण उखडल्यामुळे  खड्डेमय  झाला असल्याने या रस्त्याने जाणारे शालेय तसेच महाविद्यालयीन  विद्यार्थी  विद्यार्थिनी तसेच पादचारी, वाहनधारक यांना अपघात  होण्याची स्थिती  निर्माण  झाली आहे. रस्त्याच्या  साईड गटारी  बुजल्यामुळे अनेक ठिकाणी  शेतातील पाणी रस्त्यावर  येते. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती  करण्याची  मागणी सामाजिक कार्यकर्ते  हंबीरराव  चोरमुंगे, राजेंद्र चोरमुंगे, गुड मॉर्निंग  ग्रुप चे रमेश  पन्हाळे, प्रवरा  ट्रक सोसायटी चे संचालक  प्रमोद नालकर, भा ज पा ओबी सी सेलचे जिल्हा  सरचिटणीस  बिपीन ताठे, अतुल ताठे, नितीन ताठे, सात्रळचे सरपंच  सतीश  ताठे  आदींनी  केली आहे. 



सात्रळ माळेवाडी  रस्ता हा दळणवळणा च्या  दृष्टीने महत्वाचा असून याच रस्त्यावर महाविद्यालय, तसेच नजीकच्या कानडगाव, तांभेरे इ. गावांना जोडणाराना  रस्ता असून याच रस्त्यावर  पहाटे  मॉर्निंग  वॉक साठी जाणाऱ्या महिला पुरुषाची गर्दी असतें. उखडलेली खडीवाहनांमुळे उडून पादचारी  जखमी  होण्याची  भीति असून वाहनधारकांनाही  या रस्त्याने प्रवासकरताना कसरत  करावी लागत असून रस्ता दुरुस्तीची  मागणी होत  आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत