राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने डोंगरगण येथील गोरक्षनाथ गडावर जन...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने डोंगरगण येथील गोरक्षनाथ गडावर जनावरांसाठी चाऱ्याची तर पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
वांबोरी येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून काल वृक्षारोपण तर आज मंगळवारी डोंगरगण येथील गोरक्षनाथ गडावर जनावरांसाठी चाऱ्याची तर पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांच्या चाऱ्यांचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गँभीर बनला असल्याने हा अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राहुरी तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ मकासरे, रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष भरतजी भांबळ, रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव अमोल मकासरे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती वांबोरी अध्यक्ष अतिश मकासरे, ग्रामपंचायत सदस्य सुरज भाऊ मकासरे, सचिन मकासरे, विशाल पटेकर ,आशिष देठे, संदीप भांबळ , रॉकी पवार, नितीन भांबळ कमलाकर भांबळ , बॉबी भांबळ, प्रमोद मकासरे, नितीन ब्राह्मणे, तन्वीर शेख, अनिकेत मकासरे, निखिल भांबळ, गौरव भांबळ, पियुष पटेकर, तेजस पटेकर , महेश मकासरे, संदेश मकासरे ,प्रेम मकासरे , प्रणव गायकवाड,आर्यन मकासरे, शुभम मकासरे ,सागर राजगुरू, राजू गवते आकाश मकासरे आदीसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान बुधवारी सकाळी ११ वाजता वांबोरी येथील आंबेडकर चौकात गरजूंना इ-श्रम कार्ड वाटप करण्यात येणार असल्याचे जयंती उत्सव समितीने सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत