राहुरी(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील आदिवासी कुटुंबातील अशोक देवराम गोलवड यांचे घर अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना घडल...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील आदिवासी कुटुंबातील अशोक देवराम गोलवड यांचे घर अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना घडली अडून आज बुधवार १३ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
माहेगाव येथील आदिवासी बांधव व अंत्यत गरीब कुटुंबातील अशोक देवराम गोलवड यांचे घर अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. या आगेत गोलवड यांचे घर संपूर्णपणे खाक होऊन कुटुंब रस्त्यावर आले.
दरम्यान आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे महासचिव अनिल जाधव, तालुकाध्यक्ष संतोष चोळके, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाबाजी जगधने, उपजिल्हाध्यक्ष सोमनाथ कीर्तने, देवळाली प्रवराचे शहराध्यक्ष साईनाथ बर्डे व कार्यकर्त्यांनी कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. दरम्यान याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद नव्हती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत