नेवासे/वेबटीम-: तालुक्यातील पानेगांव येथील शेतकरी/ पत्रकार बाळासाहेब भाऊसाहेब नवगिरे यांचा मालकीच्या गट नं २२०/१/ब ९१ आर क्षेत्रातील गहू हा...
नेवासे/वेबटीम-:
तालुक्यातील पानेगांव येथील शेतकरी/ पत्रकार बाळासाहेब भाऊसाहेब नवगिरे यांचा मालकीच्या गट नं २२०/१/ब ९१ आर क्षेत्रातील गहू हार्वेस्टर च्या साह्याने दिनांक ७/४/२२/तसेच ११/४/२२रोजी संतोष मच्छिंद्र नवगिरे, संपत अशोक मते, गणेश अशोक मते, बाबासाहेब अशोक मते,अशोक गंगाधर मते,कडूबाई अशोक मते, रोहिणी बाबासाहेब मते, सविता गणेश मते,सिमा संतोष नवगिरे, गोविंद पांडुरंग आसने गहू काढत आसताने ११२पोलीस मदत केंद्राला संपर्क करुन सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन बागूल व टीमने रंगेहाथ पकडण्यात आले होते. यावेळी सपोनि बागूल यांनी काढलेला गहू तसेच हार्वेस्टर,आरोपी ताब्यात घेण्यात आले होते हे सर्व व्हिडिओ चित्रीकरणात दिसतं आसताने वरील मुद्देमाल आरोपींना अर्थिक तडजोड करुन सोडून देण्यात आला.हि सर्व बाब जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील सो यांना निदर्शनास आणून देवून दि.१२/४/२२रोजी ३९५,३७९ ५०४,५०६ सोनई पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नसून राजरोसपणे गावात फिरून आरोपी संपत मते,बाबासाहेब मते हे फिर्यादी बाळासाहेब नवगिरे यांना धमकविण्यात येत आहे.
- सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन बागूल यांचा आरोपींवर तुमचा भरवसा आहे काय? गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पाठीशी घालण्यामागचे कारण नेमकं काय असा प्रश्न या अगोदरही दाखल करण्यात आलेले आरोपींना पाठीशी घालत आहे.याबात त्यांची चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी करावी अशी मागणी जोर धरत आहे.
- कुठं नेऊन ठेवलं सोनई पोलीस स्टेशन माझं
जिल्ह्यात पोलीस अधीक्षक मनोज पाटील सो.यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग व जिल्ह्यातील पोलीस चांगल्या प्रकारे काम करुन सामान्य जनतेला न्याय देतं असून नेमकं सोनई पोलीस कारभार असा का? येथील पोलीस बहुतेक कर्मचारी बागूल यांच्या दबावाखाली असून काहिंना तर दवाखान्याची वाट धरल्याचं बोललं जातं आहे.
कार्यक्षम अधिकारी मिळावा अशी मागणी जोर धरत आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत