देवळाली प्रवरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सुरेंद्र भाऊ थोरात मित्र मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज ग...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सुरेंद्र भाऊ थोरात मित्र मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज गुरुवार दिनांक 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.




 यावेळी नाशिक म्हाडा अध्यक्ष ना.शिवाजीराव ढवळे, राहुरी तहसीलदार एफ.आर.शेख, पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे ,राष्ट्रवादीचे नेते अजित कदम ,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, शिवसेनेचे दत्ता कडू , प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब ढुस, प्रा.सतीश राऊत, कामगार नेते नानासाहेब कदम, मेजर राजेंद्र कडू नगरसेविका सुनिता थोरात आदीच्या उपस्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. 


कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेंद्र भाऊ थोरात मित्र मंडळ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत