राहुरी/वेबटीम:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या वतीने राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी म...
राहुरी/वेबटीम:-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या वतीने राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी अभिवादन करून त्याचबरोबर राहुरी शहरात अनेक ठिकाणी तर वांबोरी, सडे,टाकळीमिया अशा विविध ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हा कार्याध्यक्ष पापा भाई बिवाल, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, राहुरी तालुका अध्यक्ष प्रदीप मकासरे, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष सनी जगताप,युवक तालुकाध्यक्ष प्रतिक खरात,राहुरी शहराध्यक्ष प्रदीप रूपटक्के, दिलीप धीवर, आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत