राहुरी फॅक्टरी(वेबटीम) गेल्या दोन तीन दिवसापुर्वी तांभेरे येथे निळा झेंडा लावण्यावरुन राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबु...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
गेल्या दोन तीन दिवसापुर्वी तांभेरे येथे निळा झेंडा लावण्यावरुन राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करुन शिवीगाळ करण्यात आली होती.राहुरी पोलिसांनी अनेकांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.ज्या पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली त्याच पोलिस कर्मचाऱ्याचे हस्ते डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन गावातील सर्व समाजाचे एकात्मताचे दर्शन घडवले आहे.
तांभेरे येथील गावात दोन ते तीन दिवसापूर्वी अनाधिकृत निळा झेंडा लावण्यावरुन पोलिस व काही लोकांत वाद निर्माण झाला होता.या वादात पो.हे.काँ.ज्ञानदेव गर्जे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली होती.पो.हे.काँ.गर्जे यांच्या फिर्यादीवरुन 31लोकांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.गावात डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.ज्या गावात काही लोकांनी ज्या पोलिसास शिवीगाळ व धक्काबुक्की केली त्याच पोलिसाच्या हस्ते डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन करण्याचे ठरवले. तो पोलिस कर्मचारी तथा पो.हे.काँ.गर्जे यांना आमंञित करुन त्यांना भगवा फेटा बांधुन त्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. या अभिवादनातुन गावकऱ्यांनी एकतेचा संदेश दिला आहे.डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीस सर्वच समाजातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी तांभेरे गावचे सरपंच नितीन गागरे, उपसरपंच सागर मुसमाडे, पोलीस पाटील उत्तमराव मुसमाडे, तंटामुक्ती अध्यक्ष भिमराज बेलकर, ग्रामपंचायत सदस्य डॉ. उमेश मुसमाडे, डॉ.किशोर तांबे, मनीषा कांबळे, सुषमा मुसमाडे, पूनम शेलार, सरिता शेलार , अशोकराव गागरे, चंद्रकांत कांबळे , अशोकराव मुसमाडे, संदीप मुसमाडे, श्रीराम यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर गागरे, मराठा एकीकरणचे अध्यक्ष अमोल गागरे, दीपक मुसमाडे आकाश मुसमाडे, सुनील शेलार, बापूसाहेब मुसमाडे, सुधाकर मुसमाडे,बाळासाहेब गागरे बाळासाहेब मुसमाडे राहुल तांबे, सोमनाथ तांबे, संतोष तांबे, बाबासाहेब तांबे आदिंसह सर्वच समाजातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी आज गावात सर्वांनी एकत्रित येऊन डॉ.आंबेडकर जयंती साजरी केल्याने कौतुक करून येत्या काळात गावात सामाजिक सलोखा कायम रहावा हीच अपेक्षा व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत