कोपरगाव प्रतिनिधी- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर एस.टी.कर्मचाऱ्यांनी क...
कोपरगाव प्रतिनिधी-
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर एस.टी.कर्मचाऱ्यांनी केलेली दगडफेक हे निंदनीय कृत्य असून या घटनेचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
ना. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, घटनेने आपल्याला हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला असून आपल्या मागण्या मांडण्यासाठी विविध व्यासपीठ निर्माण करून दिलेली आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून या देशाच्या प्रत्येक नागरीकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार असला तरी अशा प्रकारचा हल्ला करणे हे लोकशाहीला मारक असून लोकशाहीसाठी अशोभनीय असून हे कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही.
शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकार समर्थपणे राज्याला प्रगतीच्या दिशेने घेवून जात आहे. देशाचे पंतप्रधान देखील अडचणींच्या वेळी त्यांचा सल्ला घेतात. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पाच दशक या देशाच्या व राज्याच्या हितासाठी खर्ची घातले आहे. सर्वपक्षीय नेते त्यांचा आदर करतात. अशा संयमी ज्येष्ठ नेत्याच्या घरावर करण्यात आलेला हल्ला निंदनीय आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने अशा भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत