कोपरगाव(वेबटीम) आज दि. ८ एप्रिल रोजी काही समाजविघातक प्रवृत्तींनी महाराष्ट्राचे दैवत आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरावर दगडफेक केली, या क...
कोपरगाव(वेबटीम)
आज दि. ८ एप्रिल रोजी काही समाजविघातक प्रवृत्तींनी महाराष्ट्राचे दैवत आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरावर दगडफेक केली,
या कटकारस्थाना मागे कोण आहे,कोण होत हे सत्य बाहेर आल्याशिवाय रहाणार नाही या लोकांना ही हिम्मत दिली कुणी त्यांची माथी कुणी भडकविली, याचा तपास पोलीस करतीलच परंतु पुरोगामी महाराष्ट्राची जनता याची योग्य ती नोंद नक्कीच घेईल परंतु या सुसंस्कृत महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं, विचार पटो अथवा ना पटो,विचारांची लढाई विचाराने लढली जाते.
काल दि. ७ एप्रिल रोजी मा.न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर एस टी कामगारांच्या महिलांनी त्याचे स्वागत करून पेढे वाटले आणि आज अचानक पवार साहेबांच्या घरावर हल्ला होतो हे काय आहे ?
विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन अश्या प्रकारे कृत्य घडवून आणत आहेत याचा महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा,संयम हा कायम आम्हीच दाखवायचा का?अशी तिखट प्रतिक्रिया अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या भ्याड कृत्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला असुन सरकारने ह्याची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसेच पडद्यामागील सुत्रधारांना लवकरच पकडावे अशी मागणी संदीप वर्पे यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत