कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनची स्थापना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनची स्थापना

अहमदनगर (प्रतिनिधी) येथील कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशन अहमदनगर ची स्थापना करण्यात आली. स्थलांतर होऊन जु...

अहमदनगर (प्रतिनिधी)



येथील कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशन अहमदनगर ची स्थापना करण्यात आली. स्थलांतर होऊन जुन्या जिल्हा न्यायालयात सुरु झालेल्या कौटुंबिक जिल्हा न्यायालयाच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांच्या हस्ते फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.  



अध्यक्षपदी अ‍ॅड. शिवाजी (आण्णा) कराळे,  उपाध्यक्षपदी अ‍ॅड. लक्ष्मण कचरे, कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. सुरेश लगड व सचिवपदी अ‍ॅड. अनिता दिघे  सहसचिवपदी अ‍ॅड. अर्चना शेलोत, खजिनदारपदी अ‍ॅड. राजेश कावरे, सदस्यपदी अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड. मच्छिंद्र आंबेकर, अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के, अ‍ॅड. शिवाजी सांगळे, अ‍ॅड. सुचिता बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यायाधीश नेत्राजी कंक म्हणाल्या की, फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनमुळे कौटुंबिक न्यायदानाच्या प्रक्रियेत मदत होणार आहे. वकिल, पक्षकार यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बार असोसिएशनची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. वकिली व्यवसायात प्रत्येकाला ताण-तणावाचा सामना करावा लागतो. प्रत्येकाने आनंदी जीवन जगण्यासाठी विचारावर नियंत्रण ठेऊन तणावमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले. नूतन अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी (आण्णा) कराळे यांनी वकीलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी बार असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असून, सर्व वकील बांधवांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले.  यावेळी अहमदनगर शहर वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल सरोदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. वांढेकर, अ‍ॅड. निर्मला चौधरी, अ‍ॅड. सेलोत, अ‍ॅड. उजागरे, अ‍ॅड. राशीनकर आदींसह पक्षकार उपस्थित होते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत