कोपरगाव(वेबटीम) दिनांक 05/04/2022 रोजी रात्री 10:00 वा ते दिनांक 06/04/2022 रोजी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास यातील फिर्यादी ज्ञानदेव रामभा...
कोपरगाव(वेबटीम)
दिनांक 05/04/2022 रोजी रात्री 10:00 वा ते दिनांक 06/04/2022 रोजी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास यातील फिर्यादी ज्ञानदेव रामभान चरमळ वय 48 वर्षे धंदा शेती रा. पढेगाव ता. कोपरगाव यांचे राहते घरासमोरुन त्यांचे मालकिची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एमएच 17 एक्स 5910 हो कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली अशी फिर्याद दिल्याने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुरनं 123/2022 भा.द.विक 379 प्रमाणे दाखल ककरण्यात आला होता
सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा व आरोपीचा गोपनीय बातमीदारामार्फत माहीती घेवुन तपास करणेत आला असून, सदर मोटार सायकल चोरास पोलीसांनी अवघ्या 24 तासाचे आत सापळा रचुन आरोपी नामे प्रदिप कैलास कदम वय 23वर्षे रा. पढेगाव ता. कोपरगाव यास पकडले असुन त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे व आरोपीने चोरुन नेलेली मोटार सायकल त्याचेकडून हस्तगत करणेत आली आहे. तसेच त्याचेकडुन चोरीस गेलेल्या आणखी मोटार सायकल मिळण्याची शक्यता आहे.
सदरची कौतुकास्पद कामगीरी मा.पोलीस अधिक्षक, श्री मनोज पाटील सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो, श्रीमती स्वाती भोर मँडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री संजय सातव सो यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे श्री दौलत जाधव पोलीस निरीक्षक, सफी ए.व्ही. गवसने, पोहेकॉ आबासाहेब वाखुरे, पोकॉ विजय पाटील सायबर सेलचे पोकॉ प्रमोद जाधव यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत