"फुलोरा" विद्यार्थी हस्तलिखिताचे मान्यवराच्या उपस्थिती मध्ये प्रकाशन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

"फुलोरा" विद्यार्थी हस्तलिखिताचे मान्यवराच्या उपस्थिती मध्ये प्रकाशन

नेवासा(वेबटीम) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिरेगावजिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी च्या सुप्त गुणांना वाव देत विविध विषयाची मांडण...

नेवासा(वेबटीम)


महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिरेगावजिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी च्या सुप्त गुणांना वाव देत विविध विषयाची मांडणी विध्यार्थी कडून करून घेऊन आज विविध क्षेत्रातील मान्यवराच्या हस्ते " फुलोरा "ह्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले..



 या मध्ये भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव, शिक्षणा चे महत्व,टेक्नो सावित्री, अश्या विविध विषय मांडले आहे.. तसेच यावेळी ऑनलाईन लिटिल शेफ मास्टर स्पर्धेचा बक्षीस वितरण करण्यात आले. या मध्ये प्रथम द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ प्राप्त विध्यार्थी ना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले व सहभागी सर्व विध्यार्थी ना सापशिडी चा खेळ देण्यात आला.. 


यावेळी शिरेगाव गावाचे सरपंच भारती ताई पवार, उपसरपंच विश्वनाथ जाधव, पोलीस पाटील, चंद्रकांत होन, शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष राहुल तुवर, ग्रामसेवक, पांडुरंग जाधव सर, भाऊसाहेब जाधव, बाळासाहेब जाधव, भाऊसाहेब तुवर, अमोल तुवर, अमोल बोर्डे, निरंजन होन, रावसाहेब पवार, चांगदेव तुवर, नवनाथ तुवर, पांडुरंग तुवर.. राहुल तुवर, पद्माकर बोर्डे तसेच ग्रामस्थ व पालक उपस्थित होते... या कार्यक्रम चे नियोजन मुख्याध्यापक श्री गावडे सरांनी केले स्पर्धे चे आयोजन हस्तलिखित निर्मिती श्रीम. बोलके मॅडम यांनी केली..आभार श्री. नरसाळे सर यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत