ही भूमी आहे शिवाची जिथं होते लहान वयात स्वराज्य तयार ही भूमी आहे भिमाची जिथं लिहिली जाती संविधानाची पाने ही भूमी आहे वीरांची जिथं आहे शूर...
ही भूमी आहे शिवाची
जिथं होते लहान वयात स्वराज्य तयार
ही भूमी आहे भिमाची
जिथं लिहिली जाती संविधानाची पाने
ही भूमी आहे वीरांची
जिथं आहे शूर वीरांच्या गाथा
ही भूमी आहे संतांची
जिथं लिहिली जाती तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी
ही भूमी आहे धर्मवीरांची
जिथं धर्मवीर छत्रपती संभाजी राजे धर्मासाठी देतात बलिदान
ही भूमी आहे शेतकऱ्यांची
जिथं मातीमध्ये बी टाकून उगवलं जात सोनं
ही भूमी आहे हुत्माची
जिथं अनेकांनी महाराष्ट्रासाठी दिले बलिदान
ही भूमी आहे आमची
जिथं समता, बंधुता, प्रेम जपले जाते
ही भूमी आहे महाराष्ट्राची
महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाची, इतिहासकारांची
मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत