देवळाली प्रवरात जिल्हाधिकारी डॉ.भोसले उसाच्या शेतात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात जिल्हाधिकारी डॉ.भोसले उसाच्या शेतात

  राहुरी(वेबटीम)      अहमदनगर जिल्ह्यामध्ये भेडसावत असलेल्या अतिरिक्त उसाचा प्रश्नच्या अनुषंगाने अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले य...

 राहुरी(वेबटीम)



     अहमदनगर जिल्ह्यामध्ये भेडसावत असलेल्या अतिरिक्त उसाचा प्रश्नच्या अनुषंगाने अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी थेट उसाच्या शेतात जाऊन शेतक-यांशी चर्चा केली.

      जिल्हाधिकारी डाॅ.भोसले हे नगरकडुन श्रीरामपूर कडे जात असताना देवळाली प्रवरा येथे ऊस तोडणी सुरू असलेल्या ठिकाणी अचानक आपल्या गाड्यांचा ताफा थांबवत  उस तोडणी करणा-यांशी संवाद साधला.यावेळी शेतकर्‍याचा ऊस गाळपासाठी जात नाही तोपर्यंत एकही कारखाना बंद न करणे बाबत बैठकीत सुचना  दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल पवार,प्रभारी तहसीलदार पूनम दंडिले, पो. निरीक्षक प्रतापराव दराडे ,भूमिअभिलेख अधीक्षक योगेश थोरात,व शेतकरी बांधव उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत