केतकी चितळे हिच्याकडून संत तुकाराम महाराजांचाही अपमान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

केतकी चितळे हिच्याकडून संत तुकाराम महाराजांचाही अपमान

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने संत तुकाराम महाराज यांचे नाव घेऊन विकृतपणे शाब्दिक मोडतोड करत  समस्त वारकरी संप्रदा...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने संत तुकाराम महाराज यांचे नाव घेऊन विकृतपणे शाब्दिक मोडतोड करत  समस्त वारकरी संप्रदाय मंडळींच्या भावना दुखविल्या असून तिच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी राहुरी फॅक्टरी येथील राजमुद्रा प्रतिष्ठानचे सुनील उर्फ सोमा शिंदे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन केली आहे.



राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी अर्जात सोमनाथ शिंदे यांनी म्हंटले की, मराठी अभिनेत्री केतकी चितळे यहिने सोशल मिडियावर धार्मिक व समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकली असून सदर पोस्टमध्य संत तुकाराम महाराज यांचे नाव घेऊन विकृतपणे शाब्दीक मोडतोड करून माझ्या व तमाम हिंदु धर्मातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेब यांना अतिशय विकृत व घाणेरड्या  शब्दामुळे  वादग्रस्त पोस्ट केले आहेत. 

एखाद्या समूहाबद्दल चिथावणी देणे  तसेच संतांचा अपमान करणे असे गैरकृत्य सदर सदर अभिनेत्रीने केले आहे. तरी तिच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुनील उर्फ सोमा शिंदे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत