राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा तात्काळ पूर्ववत करा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा तात्काळ पूर्ववत करा

राहुरी प्रतिनिधी:- राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरु करावी या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने राहु...

राहुरी प्रतिनिधी:-


राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरु करावी या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने राहुरी येथील वाहतूक नियंत्रक प्रमुखांना देण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, मजूर आदी विविध क्षेत्रातील सर्व समावेशक जनतेने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केला आहे, आणि ग्रामीण भाग हा दळणवळण सुविधेमुळे जागतिकीकरणात विकास करत आहे. परंतु अद्यापही भारत देश हा विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात एसटीचा संप सुरु होता संप काळामध्ये ग्रामीण भागातील जनतेला दळणवळण सुविधा उपलब्ध न झाल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. बहुजन हिताय.. बहुजन सुखाय.. जनतेला ठेवण्यासाठी तात्काळ राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरु करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.

तालुक्यातील ग्रामीण भागात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीच्या जीपच्या टपावर बसून पुरुषांसह महिलानाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील चिंचाळा, म्हैसगाव, बुळेपठार, चिखलठाण, कोळेवाडी या भागात वाहतुकीचे साधने कमी असल्याने प्रसंगी जीपच्या टपावर बसून प्रवास करण्याची वेळ ग्रामीण भागातील जनता आपला जीव मुठीत घेऊन करत आहे.

 तरी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन अत्यावश्यक, मुलभूत दळणवळण सेवा तात्काळ सुरु करावी. अन्यथा आम्ही भारतीय संविधानिक हक्कासाठी आपल्या कार्यालयावर कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आला.

निवेदनावर निलेश जगधने (जिल्हा प्रवक्ते), पिंटू नाना साळवे (शहराध्यक्ष), संदीप कोकाटे (महासचिव), बाबा साठे (जिल्हा संघटक), अनिल जाधव (जिल्हा महासचिव), संतोष चोळके (वंचित अध्यक्ष), बाळासाहेब जाधव, सचिन साळवे ,भाऊसाहेब पगारे (जिल्हाध्यक्ष रिपाइं, आंबेडकर) आदींच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत