शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी/वेबटीम:- सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअर...

राहुरी/वेबटीम:-


सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, स्नेहालय परिवाराचे डॉ. गिरीश कुलकर्णी, उद्योजक किशोर निर्मळ, अविनाश कुदळे, अभिजीत कुदळे ,आचर्य शुभम  कांडेकर, कृषिभूषण माऊली पवार , सुरज सूर्यवंशी ,अभिनेते भरत शिंदे,, रामदास जगताप  उपस्थित होते. साई आदर्शच्या माध्यमातून आदर्श व्यवहारामुळे सहकार क्षेत्रामध्ये साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे  यांनी आपला वेगळा ठसा व अस्तित्व जिल्ह्यांमध्ये निर्माण करून यशाच्या शिखराला   गवसणी घातली आहे. त्यामुळे कपाळे यांना  हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पारदर्शक व आर्थिक  व्यवहारातून नगर जिल्ह्यामध्ये हजारो खातेदारांचे विश्वास संपादन करणारी साई आदर्श मल्टीस्टेट सहकारी क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नावलौकिकास पात्र ठरलेली आहे. अर्थकारणाबरोबरच  सामाजिक कामातही संस्था आघाडीवर असल्याने या संस्थेचे प्रशासन चोख  पद्धतीने बजावणारे चेअरमन कपाळे यांची  पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कारानंतर शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले की सहकार चळवळ हि  ग्रामीण भागात आर्थिक नाडी म्हणून ओळखली जाते, ही चळवळ आणखी वाढावी व निकोप व्हावी अशी आमची अपेक्षा आहे .त्यामुळे या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. असे पुरस्कार हे  नक्कीच मनोधैर्य वाढवणारे  आहे ,या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ संगीता कपाळे,साई आदर्श अँग्रोचे चेअरमन  वेदांत कपाळे व साई  आदर्श परिवारातील सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत