तरुणांनी व्यवसायात सातत्य ठेऊन प्रगती साधावी - माजी नगराध्यक्ष कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तरुणांनी व्यवसायात सातत्य ठेऊन प्रगती साधावी - माजी नगराध्यक्ष कदम

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- सध्या तरुण पिढीचा कल व्यवसायाकडे जास्त प्रमाणात असून ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे. व्यवसायात चढ-उतार सुरू असतात मात...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

सध्या तरुण पिढीचा कल व्यवसायाकडे जास्त प्रमाणात असून ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे. व्यवसायात चढ-उतार सुरू असतात मात्र त्यामुळे खचून न जाता लक्ष केंद्रित करून व्यवसायात प्रगती साधावी असे प्रतिपादन देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केले.


राहुरी फॅक्टरी येथील ग्राहक भांडार जवळ सुमीत नालकर व शुभम शिंदे यांनी सुरू केलेल्या  'द फेमस यंमीज बिर्याणी' हाऊसच्या उद्घाटन प्रसंगी श्री. कदम बोलत होते.


 

यावेळी आरपीआय आंबेडकर गट जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, राहुरी तालुक्याचे युवा नेते राजू भाऊ शेटे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, मोरया ग्रुपचे युवा उद्योजक सचिन कोठुळे, माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, अमोल कदम,वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे वसंत कदम,प्रहारचे आप्पासाहेब ढुस, कुलदीप पवार, शिवसेनेचे दत्तात्रय कडू,राजू भाई शेख,शिवचरित्रकार हसन सय्यद,शरद वाळुंज,पत्रकार शिवाजी घाडगे, पत्रकार श्रीकांत जाधव,पत्रकार विजय भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.



प्रसंगी यंमीज बिर्याणी हाऊसला राहुरी फॅक्टरी, राहुरी, देवळाली प्रवरा परिसरातील मित्र परिवारांनी भेटी देऊन शुभेच्छा व्यक्त केल्यात.


यावेळी स्वरांश ग्राफिक्सचे गणेश डावखर,आकाश गुलदगड, नीरज चव्हाण, स्वराज शहाणे, विकी शिंदे, दादा शिरसाठ, प्रणय भोसले, संग्राम जाधव, योगेश तनपुरे, वैभव मैड, महेश मोरे आदिंसह मित्र परिवार उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत