वरिष्ठ वेतनश्रेणी प्रलंबित असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात शिक्षक परिषद यशस्वी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वरिष्ठ वेतनश्रेणी प्रलंबित असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात शिक्षक परिषद यशस्वी

अहमदनगर(वेबटीम) जिल्हा परिषदेमध्ये गेली दोन वर्षांपासून प्रलंबित असणारे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर होत नव्हते. त्यासाठी अहमदनगर जिल्हा...

अहमदनगर(वेबटीम)



जिल्हा परिषदेमध्ये गेली दोन वर्षांपासून प्रलंबित असणारे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर होत नव्हते. त्यासाठी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. परंतु या आंदोलनामध्ये यशस्वी तडजोड करण्यामध्ये विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे साहेब व परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर त्याचप्रमाणे शिक्षक परिषदेचे राज्य नेते  रावसाहेब रोहोकले गुरुजी यशस्वी झाले. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून सर्व प्रलंबित वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.



आंदोलनाच्या पूर्वी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याबरोबर यशस्वी चर्चा झाली होती. दिनांक 11मे 2022 रोजी तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरीसाठी कमिटीची बैठक आयोजित केली होती.  दरम्यानच्या कालावधीमध्ये नव्याने जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर येरेकर यांची नियुक्ती झाली.


शिक्षक परिषदेच्या वतीने त्यांचे स्वागत करताना राज्यनेते रावसाहेब रोहोकले गुरुजी यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजुरीची फाईल अंतिम टप्प्यात असून फक्त आपली स्वाक्षरी बाकी आहे, असे जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांना सांगितले, तेव्हा त्यांनी तात्काळ त्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे आश्वासन दिले होते.


त्यानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी पात्र प्राथमिक शिक्षकांच्या प्रस्तावांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अंतिम मंजुरी दिली असून, त्यामुळे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रलंबित असणारे दोन वर्षांपासूनचे सर्व प्रस्ताव मार्गी लागले आहेत.


त्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी ह्या तीनही महोदयांचा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आणि शिक्षक परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे, असे प्रविण ठुबे यांनी सांगितले आहे.


मागील दोन वर्षांपासून प्रलंबित वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याबद्दल अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाय, उच्चाधिकार समिती अध्यक्ष आर.पी.राहाणे, महिला आघाडी अध्यक्षा मिनाक्षी तांबे-भालेराव, विभागीय उपाध्यक्ष बाबासाहेब पवार, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र पटेकर, कार्याध्यक्ष राम निकम, सरचिटणीस दत्ता गमे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, श्रीकृष्ण खेडकर, राजुभाई इनामदार, प्रल्हाद गजभिव, शंकर गाडेकर, बाळासाहेब शेळके, मिलिंद तनपुरे, गणपत सहाणे, राजेंद्र थोरात, गणेश वाघ, संतोष खंडागळे, भिमराज उगलमुगले, बाळासाहेब मगर, रविंद्र कडू, सुभाष गरुड, रविंद्र कांबळे, रविंद्र अरगडे, खंडेराव उदे, कल्याण राऊत, संतोष खामकर,  राजेंद्र मोहोळकर, अशोक बचाटे, संतोष खोमणे, सुनील दुधाडे, संजय दळवी, दशरथ ढोले, विठ्ठल देशमुख, बाबासाहेब तांबे, योगेश देशमुख, सुजित बनकर, दिपक झावरे, दत्ता गायकवाड, सोमनाथ घुले, भाऊसाहेब हासे आदी शिक्षक परिषद पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.


गेल्या दोन वर्षांपासून नव्याने वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव स्वीकारण्यात आलेले नाहीत. याबाबत सुद्धा प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा झालेली असून नव्याने प्रस्ताव दाखल करण्यासाठी येत्या दोन दिवसांमध्ये माननीय शिक्षणाधिकारी साहेब निर्देश देणार आहेत.

         राम निकम

(कार्याध्यक्ष,अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद)


वरिष्ठ वेतनश्रेणी हा नियमित वेतनाचाच भाग असल्याने सर्व मंजूर वरिष्ठ वेतनश्रेणी धारक शिक्षकांची फरक बीले नियमित वेतनामध्ये समाविष्ट करण्यात येऊन वेतनाबरोबरच आला करण्यासाठी शिक्षक परिषदेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

       प्रविण ठुबे गुरुजी

(जिल्हाध्यक्ष,अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत