कोपरगाव(प्रतिनिधी) तालुक्याच्या पूर्व भागातील वैजापूरला उक्कडगाव मार्गे जाण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या कोपरगाव वैजापूर मार्गावरील संजीवनी...
कोपरगाव(प्रतिनिधी)
तालुक्याच्या पूर्व भागातील वैजापूरला उक्कडगाव मार्गे जाण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या कोपरगाव वैजापूर मार्गावरील संजीवनी ते पढेगाव रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावातील नागरिकांना कोपरगावला येणे जिकरीचे होवून बसले होते. त्याबाबत या गावातील नागरिकांनी या रस्त्याचे नूतनीकरण करावे अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी अत्यंत खराब झालेल्या संजीवनी ते पढेगाव गोदावरी डाव्या कालव्यापर्यंतच्या रस्त्यासाठी तब्बल अडीच कोटी निधी मंजूर करून आणला. या रस्त्याच्या कामाचे नुकतेच त्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न होवून रस्त्याच्या कामास शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गालगत असणाऱ्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून ना.आशुतोष काळे यांच्यामुळे संजीवनी ते पढेगाव रस्त्याची दैना हटली आहे.
शिंगणापूर, पढेगाव,करंजी, ओगदी, शिरसगाव, सावळगाव, कासली, आपेगाव, तिळवणी, आदी गावातील नागरिकांना कोपरगावला येण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या पढेगाव गोदावरी डाव्या कालव्यापासून ते संजीवनी पर्यंतच्या ५ किलोमीटर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी अडीच वर्षात जवळपास १४५ कोटी रुपये निधी आणला असून यामध्ये पूर्व भागातील अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत तर काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. कोपरगाव-वैजापूर मार्गावर असलेला शिरसगाव-तिळवणी येथील पूल पावसाळ्यात पाण्याखाली गेला की वाहतुकीला अडचणी येवून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तो देखील प्रश्न ना. आशुतोष काळे यांनी निकाली लावून या पुलासाठी २.९८ कोटी निधी देवून या पुलाचे देखील काम पूर्णत्वाकडे जात आहे.त्यामुळे ना. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून अनेक रस्त्यांचे भाग्य उजळले असून महत्वाच्या असणाऱ्या संजीवनी ते पढेगाव गोदावरी डाव्या कालव्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा देखील शुभारंभ झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी कारभारी आगवन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, संजय आगवन, सांडूभाई पठाण, नारायण भारती, मधुकर चव्हाण, तुषार बारहाते, जालिंदर संवत्सरकर, मंगेश बारहाते, गोवर्धन परजणे, योगेश भोकरे, संजय संवत्सरकर, योगेश कुऱ्हे, कैलास संवत्सरकर, किरण शिंदे, सुनील मलिक, मनोज शिंदे, प्रकाश मलिक, रमेश परजणे, सुरेश संवत्सरकर, अखिलेश भाकरे, लक्ष्मण निरगुडे, विलास परजणे, गणेश दाणे, घनश्याम कुऱ्हे, कैलास कुऱ्हे, बाबासाहेब शिंदे, एकनाथ शिंदे, अण्णासाहेब शिंदे, लाला आजगे, अनिल कुऱ्हे, विनोद शिंदे, बाळासाहेब जाधव, मच्छिन्द्र शेटे, सुदाम आगवन, सुनील जाधव, उत्तमराव गायकवाड, गोरक्षनाथ शिंदे, सतीश शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय शिंदे, दिलीप शिंदे, रमेश शिंदे, राजेंद्र संवत्सरकर, किरण चव्हाण, भाऊसाहेब संवत्सरकर, सचिन कुऱ्हे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत