कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात खाजगी गॅस कंपनी कडून घरगुती गॅस पुरवठा केला जातो. या गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस वितरण कं...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात खाजगी गॅस कंपनी कडून घरगुती गॅस पुरवठा केला जातो. या गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस वितरण कंपनीचे कर्मचारी आपल्या मालकांच्या संगनमताने अव्वाच्या सव्वा भाडे तसेच इतर खर्च ग्राहकाकडून वसूल करत आर्थिक लूट केली जाते. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा गॅस टाकीचे जादा पैसे कसे घेतले जातात अशी विचारणा केली असता देखील संबंधित कंपनीकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने कोपरगाव तालुक्यातील गॅस वितरण कंपनीच्या विरोधात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती चांदेकसारे येथील सामाजिक कार्यकर्ते भगिरथ होन यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये खाजगी गॅस वितरण कंपनीकडून घरगुती गॅस पुरवठा केला जातो. शासनाने ठरवून दिलेल्या गॅस टाकीच्या दरा व्यतिरिक्त प्रत्येक टाकी मागे 25 ते 50 रुपये जादा भाडे, ड्रायव्हर व इतर खर्च ग्राहकाकडून वसूल केले जातात. आधीच दुष्काळाने शेतकरी व शेतमजुरांच्या कंबरडे मोडले असताना या गॅस वितरण कंपनीने ग्राहकांची चालवलेली लूट योग्य नाही.याबाबत गॅस वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली.ग्रामीण भागातील गॅस कंपनीचा सर्व सामान्य व मोलमजुरी करणारा असून गॅस वितरण कंपनीने त्यांची अशा प्रकारे केलेली लूट योग्य नाही. संबंधित गॅस कंपनीने ही लुट त्वरित भांबवावी असे सांगत याविरोधात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे चांदेकसारे येथील सामाजिक कार्यकर्ते भगीरथ होन यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत