कोपरगाव - प्रतिनिधी तालुक्यातील मढी बुद्रुक, देर्डे चांदवड आणि देर्डे को-हाळे या तीन ग्रामपंचायतीच्या पिण्यांच्या पाणी योजनांसाठी जलजीवन म...
कोपरगाव - प्रतिनिधी
तालुक्यातील मढी बुद्रुक, देर्डे चांदवड आणि देर्डे को-हाळे या तीन ग्रामपंचायतीच्या पिण्यांच्या पाणी योजनांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा ६० टक्के निधी मंजुर झालेला असुनही त्याची उदघाटने आमदार आशुतोष काळे करत आहेत या कृत्याचा शिवसेनेच्यावतीने जाहिर निषेध करून सदरची भूमिपुजने तात्काळ रदद करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, सेनेचे पालिका गटनेते योगेश बागुल, तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे व त्यांच्या सहका-यांनी तहसिलदार व गटविकास अधिकारी कोपरगांव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, जल जीवन मिशन योजनेचा निधी केंद्र शासनाचा असुनही शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना या कार्यक्रमासाठी बोलाविले नाही त्यांचा उल्लेखही सध्या समाजमाध्यमावर फिरत असलेल्या पत्रिकेतही केला नाही., गांव पातळीला ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनाही विश्वासात घेतले नाही, शिवसैनिकांनाही कल्पना दिलेली नाही असे असतांना आमदार आशुतोष काळे हेच स्वतः या योजनांची भूमिपुजने करून परस्पर श्रेय लाटत आहेत. तेव्हा हे सर्व भूमिपुजनाची कार्यक्रमे तात्काळ रदद करावीत असेही ते शेवटी म्हणाले. यानिवेदनावर सेनेच्या प्रमुख पदाधिका-यासह युवासेनेचे प्रमुख सनि वाघ, ग्राहक संरक्षणकक्षाचे शहराध्यक्ष रविंद्र कथले, कुणाल लोणारी, निखील जोशी, अशिष निकुंभ आदिच्या सहया आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत