वैजापूर(वेबटीम) धरणग्रस्त सेवा संघाच्या वैजापूर तालुका अध्यक्षपदी यशवंत दगू निकम यांची नुकतीच निवड करण्यात आली. भूमिहीन शेतकरी, प्रकल्पग्रस...
वैजापूर(वेबटीम)
धरणग्रस्त सेवा संघाच्या वैजापूर तालुका अध्यक्षपदी यशवंत दगू निकम यांची नुकतीच निवड करण्यात आली.
भूमिहीन शेतकरी, प्रकल्पग्रस्त, गायरान जमीन धारक यांच्या न्याय हक्कासाठी धरणग्रस्त सेवा संघ महाराष्ट्रभर कार्य करत आहे.
वैजापूर तालुक्यात ही धरणग्रस्त सेवा संघाचे कार्य जोमाने सुरू असून वैजापूर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी यशवंत दगू निकम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे.
निकम यांनानियुक्तीचे पत्र धरणग्रस्त सेवा संघाच्या महाराष्ट्राचे महिला अध्यक्ष अँड. सिंड्रेला परेरा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी नेवासा तालुका अध्यक्ष सागर सावंत, अनिल बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच वैजापूर तालुक्यातील शिरसगाव परिसरातील धरणग्रस्त सेवा संघाचे यशराज निकम, दगु निकम, सोन्याबापु चव्हाण, वैभव निकम ,पांडुरंग निकम, भानुदास पवार ,कडू निकम ,ज्ञानेश्वर निकम ,अंकुश निकम, संतोष निकम, बाबासाहेब चव्हाण, अशोक पवार , संजय पवारझ बाळू पवार आदी सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत