पानेगांव (वेबटीम)- नेवासे तालुक्यातील करजगांव येथील हनुमान मंदीर-ते माकोणे वस्ती रस्त्याच्या कामासाठी काही शेतकऱ्यांनी आडकाठी आणल्यामुळे त्य...
पानेगांव (वेबटीम)-
नेवासे तालुक्यातील करजगांव येथील हनुमान मंदीर-ते माकोणे वस्ती रस्त्याच्या कामासाठी काही शेतकऱ्यांनी आडकाठी आणल्यामुळे त्या भागातील १९ शेतकऱ्यांनी हनुमान मंदिर समोर आमरण उपोषण सुरु केले होते. काल बुधवार दि.२५रोजी नेवासे तहसीलदार रुपेश सुराणा यांचा भेटीसाठी शिष्टमंडळाने येथील रस्ता बाबतच प्रकार तसेच काही शेतकऱ्यांची आडमुठेपणा जवळपास पाचशे एकर क्षेत्रावरील शेकडो शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं असल्याने येथे सुरु असलेले खडीकरण व डांबरीकरणाचे काम रखडलेले आहे.लाखो रुपयांचा निधी सभापती सुनिलभाऊ गडाख यांनी रस्त्यासाठी उभा करुनहि हे काम पुर्ण क्षमते पार पडू देत नसल्याचे तहसीलदार तसेच संबंधित बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आल्याने आठवडाभरात इस्टीमेट प्रमाणे काम करुन कुणावरहि अन्याय होणार नाही तसेच ह्या रस्त्याचा फायदा तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार असून पाऊसळ्यात होणारी दैना येथील शेतकऱ्यांची थांबणार असून लेखी आश्वासन जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता गणेश सवई,व राऊसाहेब वाघ यांनी दिल्याने उपोषण कर्त्यांनी चौथ्या दिवशी संदिप अण्णासाहेब पुराणे,सागर हिरालाल माकोणे ,गणेश चिंधे आदींना लिंबू पाणी देवून उपोषण सोडले. सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि माणिकराव चौधरी यांनी याबाबत उपोषण शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेवून वरिष्ठांनकडे पाठपुरावा केला त्यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दहिफळे,थोरात,जावळे यांनी बंदोबस्त ठेवला.
यावेळी भाऊसाहेब भाग्यवंत, माजी सरपंच चंद्रकांत टेमक, सतिश फुलसौंदर, सुहास टेमक, नामदेव फुलसौंदर शंकरराव पुराणे, संदिप पुंड, बाबासाहेब टेमक, मच्छिंद्र माकोणे,विजय साळुंखे प्रदिप माकोणे, प्रशांत माकोणे, दत्तात्रय चिंधे, कैलास पुराणे,दिलीप फुलसौंदर,बाळासाहेब टेमक, दिपक माकोणे, भाऊसाहेब टेमक, आदी उपस्थित होते.
*करजगांव येथील उपोषणकर्त्यांशेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी तहसीलदार सुराणा साहेब यांच्याशी उपोषणाबाबत यशस्वी शिष्टाई करुन उपोषण स्थगित करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी पत्रकारांचे आभार व्यक्त केले*.
- स्वतंत्र पुर्व काळापासून कधी हि न होणारे रस्ते नामदार शंकरराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा परिषदेतील अर्थ, पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिलभाऊ गडाख यांनी केले असून सर्वच शेतकऱ्यांना लाभ होत असून काही विघ्नसंतोषी लोकांनी आडमूठी भूमिका घेवू नये.चर्चेतून प्रश्न सुटून मार्गी लागले पाहिजे- सतिश सुर्यभान फुलसौंदर, सुहास टेमक,माजी सरपंच चंद्रकांत टेमक यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत