देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयाजवळील कडू तळ्याजवळ बिबट्याने मोटारसायकल स्वारावर झेप घेतली. मात...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयाजवळील कडू तळ्याजवळ बिबट्याने मोटारसायकल स्वारावर झेप घेतली. मात्र सुदैवाने बिबट्याची झेप मोटारसायकल ऐवजी जमिनीवर पडल्याने मोटारसायकलवरील एका महिन्यांनंतर बोहल्यावर चढणारा नवरदेव बालंबाल बचावला हाच बिबट्या रात्री १०.३० च्या दरम्यान हॉटेल मानवी समोरुन देवळाली शहराच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे अनेकांनी पाहिले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा शहरातील रामा गायकवाड हा तरुण एक महिन्यांनंतर बोहल्यावर चढणार आहे. बुधवारी रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान रामा गायकवाड व त्याचा मित्र प्रशांत ढुस हा आपल्या मित्राकडे गेला होता. मित्राच्या घरून परत येताना राजर्षी शाहू महाविद्यालयाजवळील कडू तळ्याजवळ बिबट्याने रामा गायकवाड व प्रशांत ढुस यांच्या मोटारसायकलवर अचानक झेप घेतली. परंतु सुदैव चांगले असल्याने बिबट्याची झेप गाडीवर न पडता गाडीच्या पाठीमागील बाजूस रस्त्यावर पडली. रामा गायकवाड व त्याचा मित्र प्रशांत ढुस बिबट्याच्या हल्ल्यात बालंबल बचावले.
हे दोन तरुण बिबट्याच्या हल्ल्यात सापडले असते तर पुढल्या महिन्यात बोहल्यावर चढणारा तरुण निश्चितच जखमी झाला असता. ही घटना प्रत्यक्ष पाहणारे अशोक कदम यांनी आंखोदेखो हाल माध्यमांशी कथन केला आहे.
या घटने नंतर हा बिबट्या रात्री १०.३० च्या दरम्यान राजश्री शाहू महाराज महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूने हॉटेल मानवी समोरून खटकळी मार्गे शहराकडे मार्गस्थ झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे.
बिबट्याने शहराकडे मार्गस्थ झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पासरल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले. बुधवारी राञी गस्तीवरील पोलिसाने मोटारसायकलवर फिरण्या ऐवजी पिंजरा गाडीचा आधार घेत गस्त घातली.बिबट्याचा मार्गस्थ होताना शहराकडे झाल्याने अनेकांनी बिबट्याची धास्ती घेतली.शहरात बिबट्या घुसुन धुमाकुळ घालण्यापूर्वी अनेक सामाजिक संघटनांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत