राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- बोकड्याच मटण खाताय तर सावधान व्हा बोकड्याच मटण नसून ते चक्क ते शेळीच्या मटणाची विक्री केली जात असल्याचे शुक्रवारी ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
बोकड्याच मटण खाताय तर सावधान व्हा बोकड्याच मटण नसून ते चक्क ते शेळीच्या मटणाची विक्री केली जात असल्याचे शुक्रवारी सकाळी काही जागृत सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघड आणला आहे त्यामुळे मटण खाणाऱ्यांनी सावधान व्हावे
राहुरी फॅक्टरी श्रीरामपूर रस्त्यालगत एका शाकिर नामक मटण विक्रेत्याच्या दुकानात बोकड म्हणून चक्क शेळीच कापली याची माहिती काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजल्या नंतर सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाकिर नामक दुकानदाराच्या दुकानावर जाऊन खात्री केली असता चक्क शेळी कापल्याचे निदर्शनास आले या उपर मटण विक्रेत्याने शेळी कापल्याचे कबूलही केले यावरून पूर्णपणे खात्री झाली की शाकिर नामक दुकानदार हा बोकड्याचे मटण विक्री करण्या ऐवजी चक्क शेळीचे मटण विक्री करत असल्याचे लक्षात आले आहे
या शाकिर नामक व्यक्तीकडून अनेकजण अत्यंत विश्वासाने मटण खरेदी करतात परंतु या शाकिर नामक व्यक्तीने सर्वांचाच विश्वासघात केल्याचे उघड झाले प्रत्येक जण आपण नेलेले मटण बोकड्याचेच होते का याची मनात खात्री करत राहिले शाकिरने केलेला विश्वासघात अनेकांच्या जिव्हारी लागल्याने अनेक ग्राहक त्याच्या दुकानासमोर येऊन शिव्या शाप देत होते. याप्रकारामुळे शुक्रवारी सकाळी शाकिरच्या दुकानासमोर अचानक गर्दी वाढू लागल्याने काय झाले याची खात्री करण्यासाठी अनेक जण थांबत होते.घडलेली घटना समजल्यांनंतर प्रत्येक जण रोष व्यक्त करत होता. मात्र ज्यांनी शेळी कापताना प्रत्येक्ष पाहिले त्यांच्या सह इतरांनाही पोलीस ठाण्यात जाण्याची तसदी घेतली नाही.यावर शाकिर या दुकानदाराने शेळी कापल्याचे कबूल करून कोणाला माझ्या विरोधात तक्रार करायची त्याने बिनधास्त करावी हा माझा व्यवसाय आहे मागणी प्रमाणे पुरवठा करणे माझे कर्तव्य आहे.कोणाला काय खायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी पाठ कापल्याचे कबुल केले आहे कोणत्याही सामाजिक संघटनेला माझ्या विरोधात कारवाई कारायची त्यांनी रीतसर करावी त्या कारवाईला सामोरे जायला मी तयार आहे असे त्या दुकानदाराने उपस्थित नागरिकांसमोर सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत