मालुंजे खुर्द,महालगाव ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेला अवैध वाळू उपसा त्वरित बंद करावा या मागणीसाठी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मालुंजे खुर्द,महालगाव ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेला अवैध वाळू उपसा त्वरित बंद करावा या मागणीसाठी

  राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द, महालगाव ग्रामपंचायत हददीत सुरु असलेल्या अवैध वाळू उपसा त्वरीत बंद करून संबंधीत ठेकेदाराव...

 राहुरी/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द, महालगाव ग्रामपंचायत हददीत सुरु असलेल्या अवैध वाळू उपसा त्वरीत बंद करून संबंधीत ठेकेदारावर त्वरीत कारवाई करावी या मागणीकरीता सामाजिक कार्यकर्ते सुभाष संसारे व किरण पंडित यांनी राहुरी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले असुन त्यांची दोन दिवसात कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही.यावर त्त्वरीत दखल घेतली नाही तर आरपीआय आठवले गटाच्या वतीने उद्या शनिवार दि.२८ मे रोजी राहुरी बस स्थानकासमोर रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा आरपीआय राहुरी तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे यांनी राहुरीच्या नायब तहसीलदार पूनम दंडिले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


या निवेदनात म्हणले की,  राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीपत्रातुन महालगावं, मालुंजे शिवारातुन परमीटच्या नावाखाली होत असलेल्या बेसुमार वाळु उपशाला राहुरी प्रशासनाचा अंधारात आशिर्वाद असल्याचे दिसत असल्याने या परिसरातील नगरीकांचे भवितव्य उजाड होण्यास वेळ लागणार नाही.


वास्तविक खालावत चाललेल्या पाणीपातळी, क्षारयुक्त पाणी या समस्येमुळे यापुर्वीच येथील शेतकरी व शेतीधंदा मोडकळीस येऊ पाहत आहे. परंतु वाळु लिलावाला बहुतांश गावात परवानगी नसताना या ठिकाणी विशेष बाब म्हणुन वीस दिवसासाठी साडेतीन हजार ब्रास वाळू उपशाचा परवाना दिला गेलेला आहे. यामागे राजकीय तसेच अधिकारी वर्गाचा वरदहस्त असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही.


वास्तविक सुर्योदय ते सुर्यास्त याच वेळेस वाळू उपसा करणे तसेच तीन फुटाच्या खाली उपसा करू नये, असे असतांना सोडतीन हजार ब्रासच्या नावाखाली एकाच दिवसात तेवढीवाळु उपसली जात असल्याचे चित्र उघड्या डोळ्यांनी नागरीक पाहत आहेत. चाळीस चाळीस टनांच्या दहा चाकी डंपरमधील वाहतुकीमुळे येथील रस्त्यांची वाट लागल्याचे दिसत असताना हा सर्व गोरख धंदा नागरीक उघड्या डोळ्याने सहन करीत आहेत. वरीष्ठ प्रशासनाने याबाबत लक्ष देऊन उपसा झालेल्या साठ्याचे मोजमाप करुन त्वरीत हा उपसा बंद करावा. अन्यथा आम्ही उद्या दि. २८ मे २०२२  रोजी राहुरी बस स्टँड चौकात रस्ता रोको आंदोलन करणार आहे. यावेळी होणाऱ्या परिणामास आपणास जबाबदार धरले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.


या निवेदनावर आरपीआयच्या सिमाताई बोरुडे, स्नेहलताई सांगळे, छायाताई दुशिंग, सुनिल चांदणे, राजू सगळगीळे, राजू दाभाडे,निलेश त्रिभुवन,नेल्सन कदम आदींच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत