कोपरगाव : संसदरत्न खा. सौ. सुप्रिया सुळे या महिलांना सक्षम करण्यासाठी मागील अनेक वर्षापासून काम करीत आहेत. त्याचा महिला महिला भगिनींना अभिमा...
कोपरगाव
: संसदरत्न खा. सौ. सुप्रिया सुळे या महिलांना सक्षम करण्यासाठी मागील अनेक वर्षापासून काम करीत आहेत. त्याचा महिला महिला भगिनींना अभिमान असून त्यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. त्यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य हा संपूर्ण महिलांचा अपमान असून ते वक्तव्य निषेधार्ह आहे असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका आंदोलना दरम्यान संसदरत्न खासदार मा.सौ. सुप्रियाताई सुळे यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकासमोर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, आज महिला चूल आणि मुल या पुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत. महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी महिलांबद्दल असे वक्तव्य करतांना थोडासा विचार करायला हवा. तुमच्या पक्षातील महिलांच्या बाबतीत तुमचा हाच दृष्टीकोन ठेवता का? जर महिलांबद्दल तुमच्या मनात अशी संकुचित विचार सरणी असेल तर तुमच्या पक्षात महिलांना पद कशासाठी देतात? असा सवाल उपस्थित करून खा. सौ. सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हा एकट्या सुप्रियाताईंचाच नाही तर सर्व महिला भगिनींचा अपमान असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे सौ. चैतालीताई काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, स्वप्नजा वाबळे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, माजी नगरसेवक गटनेते संसदरत्न खा. सौ. सुप्रिया सुळेच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याने समस्त महिलांचा अपमान- सौ. चैतालीताई काळे बोरावके, मंदार पहाडे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, माजी नगरसेविका श्रीमती वर्षा गंगूले, सौ. रमा पहाडे, सौ. संगिता वर्पे, भारती रुईकर, भाग्यश्री बोरुडे, मनीषा लकारे, पूनम पाटोळे, विजया लकारे, शितल वायखिंडे, रुपाली पनस्कर, सोनाली फुलपगर, कविता जिरे, सुषमा पांडे, सुभद्रा शेलार, ज्योती पांडे, बेबीआपा पठाण, सारिका चव्हाण, दिक्षा उनवणे, शितल लोंढे, मीना कहार, मीरा कहार, मनिषा कहार, सुमन भगत, गायत्री हलवाई, विद्या हलवाई, कुसुम आपटेकर, शिला राऊत, निता पाटोळे, आरिफा शेख, सवेरा शेख, चंद्रभागा हिंगे, उषा उदावंत, रत्ना पाठक, कांता आहिरे, रंजना उदावंत, ताई ससाणे, उस्मा शेख, माजी नगरसेवक रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकिर कुरेशी, दिनकर खरे, जावेद शेख, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, धनंजय कहार, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, इम्तियाज अत्तार, संदीप देवळालीकर, शैलेश साबळे, महेश उदावंत, ऋषिकेश खैरनार, सचिन गवारे, संतोष बारसे, मनोज नरोडे, रामदास केकाण, नारायण लांडगे, सुनील बोरा, मुकुंद इंगळे, प्रदीप मते, सागर लकारे, किशोर डोखे, विजय शिंदे, गणेश लकारे, गणेश बोरुडे, नारायण लांडगे, रवी कहार, सागर विदुर, राहुल कहार, रविंद्र राऊत, विलास पाटोळे, काका गोर्डे, मुकुंद भुतडा, दादा हलवाई, रहेमान कुरेशी, अल्ताफ अत्तार, अरबाज कुरेशी आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत