देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील कै. सौ.चंद्रकला सोपानराव चव्हाण यांच्या प्रथम पुण्य स्मारणानिमित्त चव्हाण वस्ती येथे दिनांक २८...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील कै. सौ.चंद्रकला सोपानराव चव्हाण यांच्या प्रथम पुण्य स्मारणानिमित्त चव्हाण वस्ती येथे दिनांक २८ मे ते ३१ मे या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर रोड चव्हाण वस्ती येथे सदर कार्यक्रम संपन्न होणार असून या निमित्ताने पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ८ ते ९ नाश्ता , दुपारी १२ ते १ भोजन, सायंकाळी ७ ते ९ कीर्तन व रात्री ९ ते १) भोजन असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक २८ मे रोजी सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प विष्णु महाराज पठारे (मोरया चिंचोरे) यांचे कीर्तन, रविवार २९ मे रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प अमोल महाराज बडाख(मालुंजा) यांचे कीर्तन, सोमवार ३० मे रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प मनोहर महाराज सिनारे (निंभेरे)यांचे संपन्न होणार आहे.
तसेच मंगळवार ३१ मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह. भ.प ज्योतीताई पवार(आश्वी) यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमास परिसरातील गायनाचार्य, विणेकरी, मृदंगाचार्य हार्मोनियम वादक, साथ-संगत देणारी भजनी मंडळ, संतवृंद, व्यासपीठ चालक यांचे सहकार्य लाभणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सोपान तात्या चव्हाण, सौ गितांजली व जालिंदर सोपान चव्हाण, सौ.प्रियंका व आदिनाथ सोपानराव चव्हाण, सौ गायत्री व बाबासाहेब सोपानराव चव्हाण व चव्हाण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत