देवळाली प्रवरात दिवंगत कॉ. मार्शल भाऊ संसारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सन्मान सोहळा व अभिवादन कार्यक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात दिवंगत कॉ. मार्शल भाऊ संसारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सन्मान सोहळा व अभिवादन कार्यक्रम

  देवळाली प्रवरा(वेबटीम) अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनच्या जिल्हयातील के. जे. सौमय्या फर्म में चंद्रभान डाकले फर्म व मे. एस. एच. व खटोड फर्म...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनच्या जिल्हयातील के. जे. सौमय्या फर्म में चंद्रभान डाकले फर्म व मे. एस. एच. व खटोड फर्म या खाजगी शेती फर्म, रोजगार हमी, विद्यापीठ कामगार, असंघटीत कामगारांच्या चळवळीमध्ये भागीदारी केलेल्या तसेच मे चंद्रभान रुपचंद डाकले फर्मच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या संघर्षमय लढयात अग्रेसर राहीलेले दिवंगत कॉम्रेड मार्शल भाऊ संसारे यांच्या २१ स्मृती दिना निमित्त चळवळीत योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांचा रविवार २९ मे २०२२ रोजी सकाळी १०.३० वा.  सन्मान सोहळा व अभिवादन सभा आयोजित करण्यात आला आहे.


  देवळाली प्रवरातील श्रीरामपूर रोड येथील कॉ. भि. र. बावके सभागृह, मार्शल नगर, (डाकले फार्म) येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे अध्यक्ष कॉ. गुजाबा धोंडीबा लकडे असणार असुन महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियन सरचिटणीस  कॉ. बाळासाहेब अण्णासाहेब सुरुडे,महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना अध्यक्ष कॉ. राजेंद्र भिमाजी बावके, महावितरणचे नांदेडचे अभियंता अशोकराव संसारे प्रमुख वक्ते असणार आहेत.


यावेळी कॉ. तुकाराम भुसारी, कॉ. बादशहाभाई शेख, कॉ. रुबाबबी शेख, कॉ. रामदास वाघस्कर, डॉ. जालिंदर घिगे, कॉ. जिवन सुरुडे, कॉ. उत्तम माळी, कॉ. आश्रु बर्डे, कॉ. रामा काकडे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कॉ. शरद संसारे, कॉ. मदिना शेख, कॉ. जीवन सुरुडे व शेतमजूर युनियनचे व श्रमिक शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत