ना. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून समृद्धीच्या ठेकेदारांची थकीत येणी मिळण्याचा मार्ग मोकळा – तुषार होन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ना. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून समृद्धीच्या ठेकेदारांची थकीत येणी मिळण्याचा मार्ग मोकळा – तुषार होन

कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या बहुचर्चित समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडे छोट्या-मोठ्...

कोपरगाव प्रतिनिधी



कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या बहुचर्चित समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडे छोट्या-मोठ्या ठेकेदारांची थकलेली जवळपास १९ कोटीची थकीत येणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती ठेकेदार तुषार होन यांनी दिली असून सर्व ठेकेदारांच्या वतीने ना. काळे यांचे आभार मानून सर्व ठेकेदारांनी नुकताच त्यांचा सत्कार केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडून कोपरगाव तालुक्यातील अनेक छोट्या मोठ्या ठेकेदारांनी क्रेन, ढंपर, भाडे तत्वावर देवून इलेक्ट्रिक तसेच काही छोटी मोठी कामे घेतली होती. मात्र २०२१ च्या शेवटी समृद्धी महामार्गाचे काम राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे हस्तांतरित झाल्यामुळे मागील सात महिन्यापासून अनेक ठेकेदारांची गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडे थकीत येणे बाकी होते. त्याबाबत सर्व ठेकेदारांनी अनेक वेळा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील उडवा उडवीची उत्तरे दिली जात होती. त्यामुळे सहनशीलता संपलेल्या सर्व ठेकेदारांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना निवेदन देवून चांदेकसारे परिसरात असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीच्या उभारण्यात आलेल्या कार्यालयासमोर सुधाकर होन यांच्या नेतृत्वाखाली २९ एप्रिल पासून उपोषण सुरु केले होते. याबाबत सुधाकर होन यांनी ठेकेदारांची १९ कोटीची येणी गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडे थकले असल्याचे ना. आशुतोष काळे यांच्या निदर्शनास आणून देवून ठेकेदारांनी उपोषणाचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले. त्याबाबत ना. आशुतोष काळे यांनी गांभीर्याने दखल घेवून एम. एस. आर. डी. सी. चे मुख्य कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार, शिवाजी सातपुते, भाभा पाटील यांच्यासमवेत वारंवार बैठका घेवून व गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी व राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे ठेकेदारांची थकीत येणी देण्यास भाग पाडले आहे.त्यामुळे सर्व ठेकेदारांनी उपोषण मागे घेतले आहे. 


                थकीत १९ कोटी येणी पैकी २.०५ कोटी येणी काही ठेकेदारांच्या बँक खात्यात कंपनीकडून जमा देखील करण्यात आले असल्याची माहिती तुषार होन यांनी यावेळी ना.आशुतोष काळे यांना यावेळी देवून थकीत येणी मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. तसेच सुधाकर होन यांनी देखील योग्य मार्गदर्शन करून ना. आशुतोष काळे यांच्याकडे ठेकेदारांची थकीत  येणी बाबत कैफियत मांडून न्याय मिळवून देण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानले आहे. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, संचालक आनंदराव चव्हाण, सागर होन,बाजीराव होन,तुषार होन,सोमनाथ कोते,विकास पुंगळ,अमोल राऊत,लखन औताडे,पप्पू जाधव,विशाल वर्पे,पप्पू देशमुख आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत