राहुरी फॅक्टरी/वेबटीम बालसंस्कार काळाची आणि भावी पिढीची गरज असून बालकांना बाल वयातच संस्कार देऊन पुढील पिढी संस्कारमय बनविण्याचे खरे आव्हान ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम
बालसंस्कार काळाची आणि भावी पिढीची गरज असून बालकांना बाल वयातच संस्कार देऊन पुढील पिढी संस्कारमय बनविण्याचे खरे आव्हान आजमितीला सर्व पालकांसमोर असल्याने बाल विकास शिबिर हे उत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका सुजाता कदम यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत बाल विकास शिबिर अर्थात मोफत समर कॅम्पला शुक्रवार पासून प्रारंभ झाला.
या बालविकास शिबिराचे उद्घाटन नगरसेविका सुजाता कदम यांच्या हस्ते पार पडले प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अहिल्या शेळके, खळेकर मॅडम, सोनिया विजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले.यावेळी ज्योती दीदी यांनी स्वागत केले.
या समर कॅम्पमध्ये मेडिटेशन, योगा,गेम्स व मनोरंजन या माध्यमातून नैतिक मूल्य एकाग्रता, सुसंस्कार, भौतिक विकास निरोगी शरीर यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. सोमवार १६ मे रोजी विविध स्पर्धा व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न होऊन शिबिराची सांगता होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत