कोपरगांव प्रतिनिधी कोपरगाव शहरात पुन्हा गोमांस हत्या व पुन्हा गोमांस विक्री सुरूच आहे. शहराच्या संजयनगर, बैल बाजार रस्ता या परिसरात कसाईखाना...
कोपरगांव प्रतिनिधी
कोपरगाव शहरात पुन्हा गोमांस हत्या व पुन्हा गोमांस विक्री सुरूच आहे. शहराच्या संजयनगर, बैल बाजार रस्ता या परिसरात कसाईखाना असल्याने शहराचे आरोग्य धोक्यात आले होते, म्हणून कोपरगाव नगरपरिषदेने एक कोटी रू. खर्च करून मनई भागात आधुनिक स्लॉटर हाऊस उभारल्याने शहरात होणारी बेकायदा गोहत्या बंद झाली. मनई येथे फक्त म्हैस वर्गीय प्राण्यांची कत्तल व मांस विक्री करता येते. पण संजयनगरमधील कसाई मात्र निर्लज्जपणे अजूनही संजयनगर परीसरात गोवंश हत्त्या करत आहेत.
नगरपरिषदेचे प्रशासक श्री. गोसावी साहेब, सर्व अधिकारी- कर्मचारी, पोलीस स्टेशनचे श्री. देसले साहेब, श्री.ठोंबरे साहेबही सातत्याने गोवंश हत्या होऊ नये या प्रयत्नांत आहेत. मी सुद्धा मिटिंग घेऊन संबंधीत कसायांना समजावून सांगितले, मटन विक्रीसाठी, भंगार विक्रेत्यांसाठी जागाही उपलब्ध करून दिल्या. तरीही हे बेशरम-नमकहराम गोवंश हत्या करून हिंदूंच्या भावनांशी खेळत आहेत. त्यांना राजकिय पाठबळ कुणीही देऊच नये. काल तर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोमांस आणि धारदार सुरे व कुऱ्हाडीही जप्त करण्यात आल्या. त्यांच्यामुळेच शहरातील आरोग्य व सामाजिक सलोखाही धोक्यात येत आहेत. कदाचित गोवंश हत्या या कारणामुळेच शहरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. राज्यात प्रखर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री असतांनाही कसाई जर असा नंगानाच करणार असतील तर येथून पुढे भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते.
खरे तर बेकायदा गोहत्या करणारे कसाई हद्दपारच केले पाहिजेत. शहरातील हिंदु संघटनांनीही जागरूक रहावे. कसायांना घाबरून राहाल तर नंतर पस्तावाल. ऑनलाईन समाजसेवकांनीही याविषयी जमीनीवर येऊन थोडी जागृती केली, वाईटपणा घेतला तर बरे होईल.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत