राहुरी : वेबटीम श्री कालिका देवस्थान श्री क्षेत्र कासारे देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर आमच्या निवडी कशा पद्धतीने झाल्या, याचा तपास पत्रका...
राहुरी : वेबटीम
श्री कालिका देवस्थान श्री क्षेत्र कासारे देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर आमच्या निवडी कशा पद्धतीने झाल्या, याचा तपास पत्रकारांनीचं करावा . माझ्या पेक्षा अधिक माहिती देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्षच देऊ शकतील, आसा सनसनाटी खुलासा उंबरे येथील राजेंद्र मुरलीधर उंडे यांनी करुन निवडलेल्या विश्वस्त मंडळावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे
नवीन विश्वस्त मंडळ व घटना दुरुस्ती करण्यासाठी समाज बांधवांना विश्वासात घेऊन सर्व समावेशक घटना दुरुस्ती करण्याची गरज होती. अकोले येथील कै प्रमोद शेठ रासने यांनी मोठ्या प्रयत्नाने श्री कालिका देवस्थान विश्वस्त मंडळावर तात्कालीन घटनेचा आधार घेऊन तीन सदस्यांचे विश्वस्त मंडळ तयार करुन अ.नगर येथील धर्म दायुक्ताची मान्यता मिळाली होती परंतु दोन वर्षांपूर्वी प्रमोद शेठ रासने यांचे निधन झाले.त्यानंतर राहुरी, कोपरगाव, संगमनेर,अकोले, नेवासा,श्रीरामपूर, राहता,या तालुक्यातील समाज बांधवाना विश्वासात न घेता परस्पर घटना दुरुस्ती केली. विद्यमान विश्वस्त मंडळ या विषयावर लेखी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे यामुळे सात तालुक्यातील समाज बांधवांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत