आंबी(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या केसापूर सहकारी सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी देवमन भगत व पंढरीनाथ शिंद...
आंबी(प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या केसापूर सहकारी सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी देवमन भगत व पंढरीनाथ शिंदे तर निमंत्रित संचालक पदी दत्तात्रय बडदे यांची निवड सभासद व ग्रामस्थांच्या उपस्थिती नुकतीच झाली.
केसापूर सोसायटीची निवडणूक अतिशय चुरशीची होऊन स्वाभिमानी मंडळाचे १२ संचालक मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या मासिक मिटिंगमध्ये संस्थेचे चेअरमन राजेंद्र खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वीकृत संचालक देवमन भगत यांच्या नावाची सूचना भाऊसाहेब डोखे यांनी केली. त्यास अनुमोदन बंडू टाकसाळ यांनी दिले. पंढरीनाथ शिंदे यांच्या नावाची सूचना उत्तम बोल्हे यांनी केली. त्यास अनुमोदन मारुती टाकसाळ यांनी दिले. निमंत्रित संचालक पदासाठी दत्तात्रय मच्छिंद्र बडदे यांच्या नावाची सूचना राजेंद्र टाकसाळ यांनी केली. त्यास अनुमोदन ललित टाकसाळ यांनी दिले. निवडीनंतर तिन्ही पदाधिकाऱ्यांचा हार, श्रीफळ देऊन सुदाम टाकसाळ, भाऊसाहेब शिंदे, विनायक टाकसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ संचालक गुलाबराव डोखे यांनी मनोगत व्यक्त करताना नूतन पदाधिकारी यांचे अनुभवाचा फायदा संस्थेत सूचना व मार्गदर्शन करून करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. देवमन भगत यांनी संस्थेच्या कामकाजात भाग घेऊन मदत करू अशी ग्वाही देऊन संचालकपदी संधी दिल्याबद्दल आभार मानले. चंद्रकात टाकसाळ यांनी निष्ठावान कार्यकर्ते व सभासदांना संधी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याप्रसंगी संचालक ललित टाकसाळ, बाळकृष्ण मेहेत्रे, मारुती टाकसाळ, भाऊसाहेब डोके, व व्हा. चेअरमन मधुकर रणदिवे, बंडू टाकसाळ, राजेंद्र टाकसाळ, उत्तम बोल्हे तसेच सुदाम, मच्छिंद्र पवार, भाऊसाहेब शिंदे, विनायक टाकसाळ, राधाकृष्ण टाकसाळ, माजी सरपंच गोकुळ टाकसाळ, रमेश टाकसाळ, राजेंद्र पुजारी, ग्रामपंचायत सदस्य अनील बोधक, भगीरथ रणदिवे, बाबासाहेब बडदे, आदी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव कृष्णा ज्ञानेश्वर मगर यांनी कामकाज पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत