श्रीरामपूर श्रीरामपूर तालुक्यातील गणेश गवळीराम साळवे (वय २८ वर्षे) रा. लाटे वस्ती, निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर याची जागेच्या वादातून कु...
श्रीरामपूर
श्रीरामपूर तालुक्यातील गणेश गवळीराम साळवे (वय २८ वर्षे) रा. लाटे वस्ती, निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर याची जागेच्या वादातून कुऱ्हाड, कोयता, गावठी कट्टा व इतर शस्त्रांच्या सहाय्याने हत्या करणाऱ्या फरार आरोपी प्रमिला धोंडीराम इंगळे हिला पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शाखाली पोलिस पथकाने वडाळा महादेव परिसरातून सापळा लावून ताब्यात घेतली आहे.
सविस्तर माहिती अशी की, दि. २४ मे २०२० रोजी जागेच्या वादावरुन फरार महिला आरोपी नामे प्रमिला धोंडीराम इंगळे व इतर आरोपींनी मिळून मयत गणेश गवळीराम साळवे ची हत्या केली होती. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हौशीराम गवळीराम साळवे यांच्या फिर्यादीवरून गु. र. नं. ९५०/२०२० भा.द.वि. कलम ३०२, ३२६, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ सह आर्म एक्ट ३, ७, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल सोमवारी (दि.३०) डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार महिला आरोपी प्रमिला धोंडीराम इंगळे ही आपले नाव व वेश बदलून वडाळा महादेव परिसरात येणार आहे. त्यानुसार त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करुन आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वडाळा महादेव परिसरात सापळा लावून महिला आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीसाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अश्विनी पवार, पो. कॉ. नितीन चव्हाण, पो.कॉ. विलास उकिर्डे, पो.कॉ. सचिन काकडे यांनी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत