राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- श्रीरामपूर येथील रहिवासी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा एलआयसी प्रतिनिधी विलासराव निर्मळ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
श्रीरामपूर येथील रहिवासी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा एलआयसी प्रतिनिधी विलासराव निर्मळ यांचे आज बुधवार १ जून रोजी दुखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विलासराव निर्मळ हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत असताना समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. राज्यभरात मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून मित्र कमविले होते.एलआयसी क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले होते.
आज त्यांची प्राणज्योत मालविली असून सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा,मुलगी, दोन भाऊ, भावजय, असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल माजीमंत्री बबनराव घोलप, राष्ट्रवादीचे युवा नेते अविनाश आदिक, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड,शिर्डी संस्थानच्या विश्वस्त अनुराधा आदीक, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, कामगार नेते जयंत गाडेकर, मेजर अशोक पोरजे, राकेश चव्हाण, अरुण बोऱ्हाडे, शिर्डी येथील राजेंद्र गोंदकर, संदीप सोनवणे, सुरत येथील मदन मेवाडा, पवन मेवाडा, भारत पुंड, रजनी शेट्टी, अँड.प्रसन्ना बिंगी, पत्रकार करण नवले आदिंसह विविध मित्र परिवाराने शोक व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत