देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजारतळ येथे सुरू असलेल्या संगीत राम कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आज रविवार दिन...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजारतळ येथे सुरू असलेल्या संगीत राम कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आज रविवार दिनांक २२ जून रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सांगता होणार यानिमित्ताने सत्यजीत कदम फाउंडेशनच्यावतीने महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या ७ दिवसापासून देवळाली प्रवरा बाजारतळ येथे आळंदी देवाची येथील रामकथाकार ह. भ.प गणेश महाराज कांगणे यांच्या यांच्या सुश्राव्य वाणीतील राम कथा श्रवणाचा भाविकांना लाभ मिळत आहे. कांगणे यांना अमरावती येथील गायक विवेक गावंड, तबलावादक अक्षय वाघ, कोरस सुरेश जगताप यांची सुरेल साथसंगत मिळत आहे.
आज रविवार दिनांक २१ मे रोजी सायंकाळी ६ ते ८ वेळेत कथेची सांगता व त्यानंतर सत्यजीत कदम फाउंडेशनच्यावतीने पंगत देण्यात येणार आहे.
तरी परिसरात भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत