कोपरगाव(प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकूळ नगरी रस्त्याचे काम अतिशय थंड गतीने सुरू आहे. येत्या आठ पंधरा दिवसांत पावसाळा सुरू हो...
कोपरगाव(प्रतिनिधी)
छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकूळ नगरी रस्त्याचे काम अतिशय थंड गतीने सुरू आहे. येत्या आठ पंधरा दिवसांत पावसाळा सुरू होणार आहे रस्ते खोदून जर तसेच पडले तर परिणामी स्थानिक नागरिकांचे मोठे हाल होतील, आणि हा रस्ता अतिशय वर्दळीचा रस्ता असल्याने कॉलेज चे विद्यार्थी विद्यर्थिनी, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे येणारे शेतकरी बांधव,बैलबाजार मध्ये येणारे व्यापारी,स्कुल मध्ये जाणारे छोटे छोटे छोटे विध्यार्थी, व वयस्कर ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतील.
त्याच प्रमाणे ज्या ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे तेथे बेरिगेट लावणे देखील आवश्यक आहे कारण खड्ड्यांचा अंदाज येत नाही परिणामी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येनार नाही त्या मुळे एक सामाजिक कार्यकर्ते या नात्याने मी कोपरगाव नगरपरिषद तसेच एस के येवला कन्स्ट्रक्शन यांना देखील माझी विनंती आहे की रस्त्याचे काम लवकर व चांगल्या दर्जाचे आपण करून द्यावे जेणे करून नागरिकांचे समाधान होईल कारण आपणास माहीत आहे की वर्षा नू वर्षे रस्त्याचे काम आपल्या शहरात होत नाही सुदैवाने आता निधी मंजूर होऊन काम सुरू केलं आहे तर ते चांगल्या पद्धतीने व योग्य दर्जाचे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित आहे असे सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी म्हंटले आहे.
तसेच पाईपलाईन च्या लिकेचचे तसेच नवीन पाईपलाईन चे काम आता रस्ता खोदला आहे तर पहिले तेही पूर्ण करून घ्यावे नाहीतर रस्ता झाल्यावर पुन्हा ते खोदावे लागते परिणामी नवीन रस्त्याची वाट लागते असे निसार शेख यांनी म्हंटले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत