कोपरगावात योगाभवनाचा भुमीपुजन समारंभ सोहळा उत्साहात पार पडला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात योगाभवनाचा भुमीपुजन समारंभ सोहळा उत्साहात पार पडला

  कोपरगाव प्रतिनिधी  मा.खा.श्री.सदाशिव लोखंडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मंजूर निधी रु.७५ लक्ष योगाभवनाचा भ...

 कोपरगाव प्रतिनिधी



 मा.खा.श्री.सदाशिव लोखंडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मंजूर निधी रु.७५ लक्ष योगाभवनाचा भूमीपुजन समारंभ सोहळा सर्वे नं.११६ साइसिटी कोपरगाव येथे उत्साहात आज पार पडला. सार्वजनिक बांधकाम विभाग व कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सा.बा.विभागाचे अभियंता वाकचौरे साहेब व कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. 



या प्रसंगी मा.खा.सदाशिव लोखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे व पोहेगाव पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन औताडे यांच्या हस्ते भूमिपूजन करून नारळ फोडण्यात आले व उपस्थित मान्यवरांचा सा.बा.विभागाचे अभियंता वाकचौरे साहेब यांच्या हस्ते यथोचित सत्कार  करण्यात आला.  तसेच खा.सदाशिव लोखंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व योग साधनेचे महत्व सांगितले तसेच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे राज्यातील कोरोना काळातले काम उत्कृष्ठ असल्याचे सांगितले. 


या वेळी शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख मा.श्री.राजेंद्रजी झावरे,मा. नगराध्यक्ष विजय वहाडणे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश काका कोयटे,शिवसेना नेते नितीनराव औताडे, शिववाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,मा.नगरसेविका वर्षाताई शिंगाडे,युवतीसेना जिल्हाधिकारी आक्षिता आमले, कोपरगाव शिवसेना सचिव बाळासाहेब साळुंके,शेतकरी सेनेचे किरण खर्डे,जिल्हा नियोजन समिती सदस्य विशाल झावरे,उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे,शेखर कोलते,विकास शर्मा, सुनील कुंढारे,योगेश उशीर,समन्वयक सागर सोमवंशी,संघटक वैभव गिते,सहसंघटक दिपक बरदे,सोशल मिडियाप्रमुख अशोक पवार,वसीम शेख,वाहतुकसेना उपजिल्हाप्रमुख अमजद शेख,किरण कुर्हे,अविनाश धोक्राट,प्रवीण शेलार,जाफर सय्यद,संतोष झावरे,विभागप्रमुख शैलेश वाघ,निखिल मढवई,सतीश खर्डे,निशांत झावरे,निलेश पवार,दिपक चौधरी,शिवराष्ट्र तरुण मंडळाचे संजय बाविस्कर,अंबादास वाघ,विजय सोनवणे,श्रीपाद भसाळे,अक्षय नन्नावरे,रवींद्र पवार, वेदांत कर्पे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत