देवळाली प्रवरा येथील सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणारे हजरत शहा दावल मालिक बाबा यांचा उरूस उद्या गुरुवार दिनांक ५ रोजी संपन्न होणार असल्...
देवळाली प्रवरा
येथील सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणारे हजरत शहा दावल मालिक बाबा यांचा उरूस उद्या गुरुवार दिनांक ५ रोजी संपन्न होणार असल्याची माहिती दर्गा प्रमुख आकिल बाबा पटेल यांनी दिली आहे.
उरूस निमित्त विविध तरुण मंडळे, धर्मगुरू ,समाजसेवक उद्योजक ,डॉकटर्स,विधी तज्ञ व भाविक भक्तां च्या वतीने व साक्षीने अजमेर राजस्थान इथून आणलेली पवित्र चादर अर्पण करण्यात येणार आहे.
दर्गा परिसरात लंगर,भंडारा महाप्रसादाचे आयोजन रात्री सव्वा सात ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रसिद्ध कव्वाल युसूफ शोला यांच्या शानदार कव्वाली चा कार्यक्रम होणार आहे,या कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहण्याची विनंती हजरत शहा दावल मालिक खादिम कमिटी,व्यवस्थापन समिती, मौलाना आजाद सेवा प्रतिष्ठान,कृषी बाबा प्रोडूसर कंपनी, तसेच आकिल व अब्बास भाई पटेल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खादीम कमिटीचे सदस्य सर्वश्री मुरलीधर तांबे सर, बाळासाहेब जोशी,शरद टेकावडे, आप्पासाहेब शेळके, जान महंमद इनामदार, नवनाथ क्षीरसागर,डॉ. प्रशांत मालकर ,रशीद सय्यद ,रवींद्र पेरणे, जावेद तांबोळी रमेश गाडे आशिष ढेरे, सचिन नालकर ,जावेद शेख आदी प्रयत्नशील आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत