राहुरी फॅक्टरी(वेबटीम) तरुणांनी स्वतःला नोकरीत गुंतून न घेता स्वता:चा व्यवसाय सुरू करून प्रगती साधल्यास भविष्य निश्चितच उज्जवल असल्याचे प्रत...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
तरुणांनी स्वतःला नोकरीत गुंतून न घेता स्वता:चा व्यवसाय सुरू करून प्रगती साधल्यास भविष्य निश्चितच उज्जवल असल्याचे प्रतिपादन राज्याचे उर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील श्री दत्त कॉम्प्लेक्स येथे सिद्धार्थ कड यांनी नव्याने सुरू केलेल्या सिद्धार्थ स्टाईल हब' या परिपूर्ण भव्य दालनाचा उद्घाटन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ना.तनपुरे यांच्या हस्ते पार पडले. प्रसंगी ना.तनपुरे बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगरसेवक तथा शिवबा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ कराळे, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे,साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजीराव कपाळे,रामचंद्र काळे,शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील कराळे,प्रदीप येवले, विष्णुपंत गीते, किशोर थोरात, विलास कड, डॉ.रवी घुगरकर, डॉ.गोपाळकृष्ण रत्नपारखी, अमोल वाकचौरे,अमोल कुऱ्हाडे,विवेक विश्वासराव, शुभम वासकर, अजिंक्य गायकवाड, साहिल पठाण सोहेल शेख अजय गीते, सागर तलवार, सुशांत भोसले, रवींद्र तुपे, उदयराव ढमे, सुधीर कुंजिर उपस्थित होते. सिद्धार्थ प्रकाश कड यांनी सर्वांचा सत्कार केला तर आलेल्या सर्व पाहुण्यांचे प्रकाश कड यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत