देवळाली प्रवरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्य...

देवळाली प्रवरा(वेबटीम)


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध विनयभंग व पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत १४ वर्षीय शाळकरी मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हणले की,मी देवळाली प्रवरा येथे महाविद्यालयात उन्हाळी क्लासला रोज येत असून आज ०४ मे रोजी साडेअकराच्या सुमारास क्लास संपल्यानंतर घरी जात असताना शाळेच्या थोड्या अंतरावर तीन मुले माझ्या पाठीमागून जवळ आली त्यातील एक मुलगा मला नेहमी त्रास देत असत त्यावेळी तो मला म्हणाला की,तू थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे असे म्हणून त्याने माझा हात ओढला.मी तेथून जाऊ लागल्यानंतर लज्जा उत्पन्न होईल असे कृत केले त्यावेळी त्याच्या सोबत असणाऱ्या साथीदारांनी तू त्याला फार आवडते त्याला तुझ्याशी बोलू असे म्हणून त्याची साथ देऊ लागले. त्यावेळी मी तेथून माझी सुटका केली त्यांनंतर घडलेला प्रकार माझे चुलते यांना सांगितला  ते त्या ठिकाणी आल्या नंतर मुले दाखव व तू पुढे चालत जा असे सांगीतले त्यावर मला त्रास देणारे ते तिघे उभे होते त्यातील एकास माझ्या चुलत्यांनी पकडले व अन्य दोघे पसार झाले.


दरम्यान याबाबत सदर अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादिवरून एका अल्पवयीन मुलासह शंकर धोत्रे, राकेश संसारे (पूर्ण नाव माहीत नाही) रा.देवळाली प्रवरा यांच्या विरुद्ध भा.द.वि.कलम ३५४अ,३५४ड, बालकांचे लैगिंक अपराधांपासून संरक्षण अधिनियम ८/१२ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारहेडा हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत