समाज मंदिरासाठी निधी कमी पडल्यास जास्तीचा निधी देणार – ना. आशुतोष काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

समाज मंदिरासाठी निधी कमी पडल्यास जास्तीचा निधी देणार – ना. आशुतोष काळे

  कोपरगाव :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध समाजाच्या समाज मंदिरांसाठी निधी दिला असून समाज मंदिराची कामे सुरु झाली आहेत. या समाज मंदिर...

 कोपरगाव



:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध समाजाच्या समाज मंदिरांसाठी निधी दिला असून समाज मंदिराची कामे सुरु झाली आहेत. या समाज मंदिरात सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजे त्यादृष्टीने आदर्शवत समाजमंदिर उभे राहण्यासाठी अधिकच्या निधीची गरज पडल्यास जास्तीचा निधी देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही ना. आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव शहरातील विविध समाजमंदिरांचे भूमिपूजन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.   



कोपरगाव शहरातील विविध समाजाच्या समाज मंदिरासाठी निधी मिळावा अशी अनेक समाजबांधवांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी सर्व समाजाला न्याय देवून प्रत्येक समाजाच्या मंदिर व समाज मंदिरासाठी निधी दिला आहे. या निधीतून मतदार संघासह कोपरगाव शहरातील अनेक समाज मंदिराचा समावेश आहे. यापैकी प्रभाग क्र. १३ मधील गजानन नगर मध्ये १५ लक्ष ७० हजार रुपये निधीतून परीट समाजाच्या सभा मंडपाचे व गोरोबानगर येथे १० लक्ष रुपये निधीतून कुंभार समाजाच्या सभामंडपाचे भूमिपूजन नुकतेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले आहे.       


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, दिनकर खरे, सौ. मायादेवी खरे, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, बाळासाहेब रुईकर, वाल्मिक लहिरे, कोळगाव थडीच्या सरपंच सौ. मिनल गवळी, एकनाथ गंगूले, आकाश डागा, राजेंद्र आभाळे, शैलेश कदम, नितीन साबळे, मनोज नरोडे, संदीप सावतडकर, मुकुंद इंगळे, शिवराम निकम, सुनील फंड, दिलीप आरगडे, अरुण शिरसाठ, बाळासाहेब जगताप, अनिल देसाई, गणेश बोरुडे, निवृत्ती वाघ, मंगेश सोनवणे, संजय जगताप, किशोर राऊत, आकाश गायकवाड, विशाल निकम, बापू जाधव, गिरीश जाधव, राजेंद्र जाधव, विवेक फंड, मयूर गायकवाड, विकास राऊत, चंद्रशेखर गवळी, गणेश जगताप, अनिल बोरुडे, ज्ञानेश्वर जाधव, चंद्रकांत वाघमारे, अॅड. सुयोग जगताप, रविंद्र जाधव, अशोक बोरुडे, ऋषिकेश गायकवाड, संदीप दळवी, नितीन शिंदे, किरण आघाडे, प्रसाद निकम, सनी गवळी, चंद्रकांत वाघमारे, विजय शिंदे, सौरभ गायकवाड, विशाल निकम, अशोक आव्हाटे, सचिन गवळी, दत्तात्रय जोर्वेकर, विनायक गायकवाड, सुभाष जोर्वेकर, विक्रांत सोनवणे, अर्जुन चव्हाण, भानुदास बडे, दत्तात्रय गायकवाड, दत्तू ईश्वरे, निकेतन गायकवाड, राहुल गायकवाड, गणेश चव्हाण, मच्छिन्द्र ईश्वरे, अण्णासाहेब जाधव, संजय जगदाळे, चंदू जोर्वेकर, दिलीप जोर्वेकर, काकासाहेब गायकवाड, संदीप गायकवाड, प्रदीप वाकचौरे, गणेश वाकचौरे, दिपक गायकवाड, जगदीश मोरे, मयूर जोर्वेकर, दत्तात्रय उपाध्ये, संजय जोर्वेकर, डॉ. जगदाळे, बाबासाहेब देवतरसे, अशोक सोनवणे पुंडलिकजी वायखिंडे, आकाशजी सोळसे, दिनेशजी संत, विकीजी जोशी, शुभमजी लासुरे, कैलासजी मंजुळे, तेजसजी साबळे, किरणजी बागुल,भाग्यश्रीताई बोरुडे, साळवेताई, प्रमिलाताई जाधव, संध्याताई जगताप, मनिषाताई गवळी, सोनालीताई राऊत आदी मान्यवरांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत