सात्रळ/वेबटीम:- नगर दक्षिण मतदार संघातील आणि प्रवरा परिसरातील सोनगांव धानोरे पाणीपुरवठा योजना साठी २० कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्...
सात्रळ/वेबटीम:-
नगर दक्षिण मतदार संघातील आणि प्रवरा परिसरातील सोनगांव धानोरे पाणीपुरवठा योजना साठी २० कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत मिळाली असल्याची माहिती सोनगावचे उपसरपंच किरण पाटील अंत्रे यांनी दिली.
या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे रु. २० कोटी ३६ लाख ६२ हजार रुपये खर्च येणार आहे. या योजनेला महाराष्ट्र जिवन प्राधिकरण समितीने तांत्रिक मान्यता दिली होती.सोनगांव धानोरे गावांकरीता वरदान ठरणा-या या पाणी योजनेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने सोनगाव –धानोरे तसेच वाड्या वस्त्त्यावरील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असुन लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन काम सुरु होईल.
सोनगांव – धानोरे पाणी पुरवठा योजनेसाठी वेळोवेळी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचे सोनगाव चे उपसरपंच किरण पाटील अंत्रे यांनी सांगितले. सदर योजनेला ६ कोटी रुपये मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजूर होते परंतु प्रती माणसाला प्रती दिवस चाळीस लिटर अंदाजाने योजना राबवायची होती परंतु केंद्र शासनाच्या सुधारित आदेशाने चाळीस ऐवजी पंच्चावन्न लिटर प्रती दिवसाच्या प्रमाणे अंदाजपत्रक ६ कोटीत बसने शक्य नव्हते म्हणून सदर योजना ही केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. सदर योजनेला अजून ब-याच अडीअडचणी असून त्यापैकी सर्वात मोठी अडचण म्हणजे साठवण तलावासाठी सोनगाव व धानोरे गावाला गायरान किवा ग्रामपंचायतच्या मालकीची जागा उपलब्ध नाही खा. सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून साठवण तलावाच्या जागेसाठी सोनगाव हद्दीतील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावाच्या जागेची प्रशासनाकडून नाहरकत घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सौ. शालिनीताई विखे पाटील अध्यक्षा असताना त्यांनी सोनगाव धानोरे पाणी पुरवठा प्रश्नाबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुन हा प्रश्न मार्गी लावला आहे. प्रस्तावीत योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याने विखे पाटील कुटुंबियांमुळे दोन्ही गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनांची लवकरच निविदा प्रक्रिया पार पडून लवकरच कामांना सुरवात होईल. या नवीन पाणीयोजनेमुळे सोनगांवचे सरपंच अनिल अनाप ,उपसरपंच किरण पाटील अंत्रे,सुभाष पाटील अंञे,सुभाष नामदेव अंञे पाराजी धनवट,मच्छींद्र पाटील अंञे, राजेंद्र अनाप,नारायण धनवट,संदीप अनाप ,प्रशांत अंञे,शामराव अंञे,मथाजी अनाप, एजाज तांबोळी,सुभाष शिंदे,मोहम्मद तांबोळी,चंद्रकांत अनाप,संतोष अंञे, धानोरेचे सरपंच शाम माळी उपसरपंच ज्ञानेश्वर दिघे,ॲड आप्पासाहेब दिघे,बाळासाहेब दिघे,किरण दिघे,अमोल दिघे, यांच्यासह परीसरातील ग्रामस्थांनी विखे पाटील कुटुंबियांचे आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत